रॉकेट बनलाय या सरकारी कंपनीचा शेअर...! अवघ्या 7 दिवसांत 80% वधारला, एका वर्षात एवढा बंपर परतावा दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 17:35 IST
1 / 8महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (MTNL) शेअरमध्ये तुफान तेजी दिसत आहे. हा शेअर सोमवारी 10 टक्क्यांच्या तेजीसह 76.25 रुपयांवर पोहोचला आहे. एमटीएनएलच्या शअरने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. 2 / 8हा शेअर शुक्रवारी 69.32 रुपयांवर बंद झाला होता. हा शेअर 7 दिवसात 80% हूनही अधिक वधारला आहे. जास्त वाढला आहे. एमटीएनएल शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 19.37 रुपये आहे.3 / 87 दिवसांत 80% ची उसळी - महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा शेअर अवघ्या 7 दिवसांत 80 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. 11 जुलै 2024 रोजी एमटीएनएलचा शेअर 42.30 रुपयांवर होता. तो 22 जुलै 2024 रोजी 76.25 रुपयांवर पोहोचला. 4 / 8MTNL चा शेअर गेल्या 5 दिवसांत 61% ने वधारला आहे. 15 जुलै 2024 रोजी कंपनीचा शेअर 47.38 रुपयांवर होता. तो 22 जुलै रोजी 76.25 रुपयांवर पोहोचला. MTNL चा शेअर्स 13 दिवसात 90% ने वधारला आहे. या काळात कंपनीचा शेअर 40 रुपयांवरून 76 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 5 / 8एका वर्षात दिला 287% परतावा - महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या शेअरने गेल्या एका वर्षात 287% चा परतावा दिला आहे. टेलिकॉम कंपनीचा शेअर 24 जुलै 2023 रोजी 19.74 रुपयांवर होता, जो 22 जुलै 2024 रोजी 76 रुपयांच्याही वर गेला आहे. 6 / 8या वर्षात आतापर्यंत एमटीएनएलचा शेअर जवळपास 130% ने वाधारला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी टेलिकॉम कंपनीचा शेअर 33.23 रुपयांवर होते. जो 22 जुलै 2024 रोजी 76.25 रुपयांवर पोहोचला. गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा शेअर (MTNL) 120% ने वधारला आहे.7 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)