SBI-AXIS-BoB-ICICI..; कोणती बँक सर्वात स्वस्त कार लोन देते, ₹10 लाखांसाठी किती EMI येईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 14:19 IST
1 / 6Car Loan: कार खरेदीसाठी बँकेतून कर्ज घ्यायचे असल्यास कमी व्याजदर आणि सोप्या अटींवर घेणे शहाणपणाचे ठरते. मात्र हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुमचा सिबिल स्कोअर 800 किंवा त्यापेक्षा जास्त आणि तुमचे मासिक उत्पन्न चांगले असेल. बँका ह्याच आधारावर ग्राहकाला सुरुवातीच्या (सर्वात कमी) व्याजदरावर कर्ज द्यायचे की नाही, ते ठरवतात. आज आम्ही तुम्हाला एसबीआय, अॅक्सिस, बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार लोनची माहिती देणार आहोत.2 / 6SBI- एसबीआय सध्या नवीन कारसाठी 8.85% व्याजदराने कार लोन देत आहे. तुम्ही 10 लाखांचे कर्ज 5 वर्षांसाठी घेतले, तर मासिक ईएमआय ₹20,686 होईल. या कर्जावर तुम्हाला ₹2,41,138 व्याज म्हणून भरावे लागतील.3 / 6Axis Bank- अॅक्सिस बँक सध्या 8.80% व्याजदराने कार लोन देते. 10 लाखांचे कर्ज 5 वर्षांसाठी घेतल्यास मासिक ईएमआय ₹20,276 येईल. या कर्जावर एकूण ₹2,16,584 व्याज भरावे लागेल.4 / 6Bank of Baroda (BoB)- बँक ऑफ बडोदा कार लोन 8.15% व्याजदराने उपलब्ध करून देते. 10 लाखांचे कर्ज 5 वर्षांसाठी घेतल्यास मासिक ईएमआय ₹20,348 होईल. या कर्जावर तुम्हाला ₹2,20,895 व्याज द्यावे लागेल.5 / 6ICICI Bank- आयसीआयसीआय बँक सध्या 9.15% व्याजदराने कार लोन ऑफर करते. 10 लाखांचे कर्ज 5 वर्षांसाठी घेतल्यास मासिक ईएमआय ₹20,831 होईल. या कर्जावर तुम्ही एकूण ₹2,49,874 व्याज भराल.6 / 6वरील चार बँकांच्या व्याजदरांची तुलना करता असे दिसते की, बँक ऑफ बडोदाचे कार लोन सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे आपल्या सोयी आणि पात्रतेनुसार तुम्ही या बँकांकडून कार लोनसाठी अर्ज करू शकता.