म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Salary Calculator : पगार मिळताच 'हे' काम करा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 17:03 IST
1 / 6नवी दिल्ली : सध्या महागाई इतकी वाढली आहे की, लोकांचा खर्च भागत नाही. महिना संपायच्या आत पगारही संपतो. अशा परिस्थितीत लोकांनी पगार मिळताच काही निर्णय घेणं गरजेचं आहे. अन्यथा महिना अखेर काही शिल्लक उरणार नाही.2 / 6सध्या व्यावसायिकांपेक्षा नोकरदार वर्ग सर्वाधिक आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना महिना संपल्यानंतर पगार दिला जातो. सध्या महागाई इतकी वाढली आहे की लोकांचा खर्च भागत नाही आणि लोकांचा पगारही संपतो. अशा परिस्थितीत पगार मिळताच लोकांनी काही पावले उचलली पाहिजेत, अन्यथा सर्व पैसे संपू शकतात.3 / 6पगारातील पैशांची बचत करणे ही एक कला आहे. पण पगार मिळताच लोक पैसे खर्च करतात. दुसरीकडे, गुंतवणुकीकडे कानाडोळा करतात. अशा स्थिती असेल वेळीच सावध राहणे गरजेचे आहे. 4 / 6चुकीच्या धारणेनुसार लोक पगार झाला की, आपला खर्च भागवतात आणि मग महिन्याच्या शेवटी पगारातून जे पैसे वाचतील त्यातून गुंतवणूक करतात. पण यामुळे बचत किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक होऊ शकत नाही.5 / 6पगार येताच लोकांनी पहिल्यांदा बचत आणि गुंतवणुकीला दिले पाहिजे. बचतीची रक्कम बाजूला काढून खर्च भागवण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. जर तुम्ही असे केले नाही तर संपूर्ण पगार संपू शकतो आणि नंतर बचत किंवा गुंतवणूक करता येणार नाही.6 / 6पगार येताच बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याने अनावश्यक खर्चालाही आळा बसेल. तसेच, संपूर्ण महिन्यात कोणते खर्च प्राधान्याने राहतील आणि कोणते खर्च केले नाहीत तरी चालतील, यावर लक्ष राहील. अशा परिस्थितीत पगार येताच तात्काळ बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे.