Retirement Planning : सॅलरी, वय अन् निवृत्ती..! ६० व्या वर्षी तुमच्याकडे किती पैसे हवेत?, गणित समजून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:56 IST
1 / 10एकेदिवशी सगळ्यांनाच निवृत्त व्हायचं आहे. परंतु वेळ असतानाच रिटायरमेंट प्लॅनिंग केले तर वृद्धापकाळ आरामदायी होईल. मात्र बऱ्याचदा लोक आर्थिक प्लॅनिंग करत नाहीत. त्यामुळे म्हातारपणी त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. 2 / 10बरेच जण जेव्हा नोकरी करतात तेव्हा गुंतवणुकीबाबत फारसे गंभीर नसतात. आयुष्य सुरळीत चाललंय असं त्यांना वाटत असते परंतु सत्य तसे नसते. जेव्हा तुम्ही कमावता तेव्हा रिटायरमेंटबाबतही विचार करायला हवा. त्यासाठी तुम्ही कधी रिटायर होणार हे आधीच ठरवायला हवे. रिटायरमेंटनंतर काय करायचे हेदेखील नियोजन करावे.3 / 10रिटायरमेंटवेळी तुमच्या हातात किती पैसा असायला हवा हादेखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल हे आता कसं ठरवू शकतो... बहुतांश लोकांचा याबाबत गोंधळ उडतो. म्हातारपणी किती पैशांची आवश्यकता भासेल हे कसं ठरवायचे यावर कन्फ्यूजन असते. 4 / 10सगळ्यात पहिले तुम्हाला नोकरी करतानाच रिटायरमेंटबाबत प्लॅनिंग करायला हवं. आता मुद्दा हा की, रिटायरमेंटवेळी तुमच्या हातात किती पैसे असायला हवेत..? त्यासाठी एका फॉर्म्युल्यावर काम करावं.तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे तुमच्या इन्कमवर अवलंबून असते म्हणजे जॉब करताना तुमच्याकडे किती सॅलरी आहे त्यावरून रिटायरमेंट फंड किती असायला हवा याचं प्लॅनिंग केले जाते.5 / 10एक उदाहरण घ्या - आता तुमचे वय ४० आहे, तुम्हाला महिन्याला १ लाख सॅलरी आहे. सरासरी निवृत्तीचे वय ६० वर्ष असते, परंतु सध्या लोक ५० वर्षातच रिटायरमेंट प्लॅनिंग करतात. मात्र आपण ६० वर्ष निवृत्तीचे वय धरूया, त्यानुसार तुमच्याकडे २० वर्ष शिल्लक आहेत.6 / 10आता समजा, तुम्ही तुमच्या गरजेनुसार अंदाज लावा, जर तुम्हाला निवृत्त व्हायला लागलं आणि तुमचे वय ६० वर्ष झाले तर तुम्हाला किती रक्कम निवृत्तीवेळी हाती हवी..जर तुमची सॅलरी १ लाख आहे तर फॉर्म्युल्यानुसार सध्याच्या पगाराच्या १०० पटीने तुमच्याकडे फंड हवा. त्या हिशोबात १ कोटी रुपये निवृत्तीवेळी हातात हवेत.7 / 10जर तुमचे वय ४० वर्ष आहे आणि सॅलरी १ लाख रुपये असेल तर वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्याकडे किती पैसे हवेत याचा अंदाज घ्या. रिटायरमेंट कॅलक्युलेटरच्या हिशोबाने २० वर्षांनी आजची महागाई पाहता तुमच्याकडे कमीत कमी ३.२० कोटी रुपये असायला हवेत. म्हणजे आजचे १ कोटी म्हणजे २० वर्षानंतर त्याचे मूल्य ३.२० कोटी रुपये असतील. यात सरासरी ६ टक्के महागाई दर वार्षिक अंदाज लावता येईल.8 / 10४० वर्ष, पगार १ लाख रुपये मग किती गुंतवणूक करायला हवी जेणेकरून २० वर्षांनी ३.२० कोटी रुपये मिळतील, त्यासाठी तुम्हाला ३२४०० रुपये मासिक SIP करावी लागेल. त्यात अंदाजे १२ टक्के रिटर्न अपेक्षित आहेत जे सध्या शक्य आहे.9 / 10जर १५ टक्के रिटर्न मिळणार असतील तर २१२४० रुपये मासिक SIP पुढील २० वर्षासाठी करावी लागेल. याचे गणित समजून घेण्यासाठी तुम्हाला अनेक वेबसाईटची मदत मिळू शकते. हे केवळ एक उदाहरण आहे. 10 / 10तुमचे वय, तुमचे उत्पन्न याचा अंदाज घेत रिटायरमेंट फंड प्लॅनिंग असावे. महिन्याला होणारी बचत हेदेखील ठरवू शकतो. भलेही तुमचे उत्पन्न महिन्याला ५० हजार आहे किंवा लाखो आहे. रिटायरमेंट सर्वांनाच घ्यावी लागते. सर्वांचे खर्च वेगवेगळे असतात. वृद्धापकाळात सर्वाधिक खर्च मेडिकलवर होतो.