पीपीएफ योजनेचा कालावधी वाढवण्यासाठी अर्ज कधी करावा? 'ही' तारखी चुकली तर सर्व मेहनत पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:01 IST
1 / 5दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना लोकप्रिय आहे. ही सरकारी योजना सुरक्षित आणि टॅक्स सेव्हिंग आहे. जर तुम्ही या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्ही काही वर्षांतच चांगली रक्कम जमा करू शकता.2 / 5 पीपीएफ योजनेत जमा केलेल्या रकमेवर ७.१ टक्के व्याजदर परतावा मिळतो. हा व्याजदर सरकारकडून दरवर्षी जाहीर केला जातो. पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. पण, तुमची इच्छा असेल तर पीपीएफ योजने आणखी वाढवू शकता.3 / 5आज आपण पीपीएफ योजनेची मुदत वाढवण्याच्या नियमांबद्दल माहिती घेऊ. पीपीएफ योजना किती वेळा वाढवता येते? त्याची प्रक्रिया कशी आहे? चला जाणून घेऊ.4 / 5तुम्ही १५ वर्षांनंतर पीपीएफ योजनेची मुदत वाढवू शकता. एकदा मुदतवाढ दिल्यानंतर, ही योजना पूर्ण ५ वर्षांसाठी वाढवली जाईल. यासाठी तुमच्याकडे २ प्रकारचे पर्याय आहेत. पहिल्या पद्धतीत तुम्ही योगदान वाढवून कालावधी वाढवू शकता. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये, तुम्ही तुमचे खाते कोणत्याही योगदानाशिवाय चालू ठेऊ शकता.5 / 5पीपीएफ योजनेत तुम्हाला किती वेळा मुदतवाढ मिळू शकते? यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. हा कालावधी वाढवण्यासाठी तुम्हाला एक अर्ज द्यावा लागतो. पण, हा अर्ज मुदतपूर्तीच्या तारखेच्या १ वर्ष आधी सादर करावा लागेल.