₹५ लाखांचे बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:34 IST
1 / 7Financial Freedom Step Formula: प्रत्येकजण आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्याचं (Financial Freedom) स्वप्न पाहतो, पण ही काही एका रात्रीत साध्य होणारी गोष्ट नाही. हा एका जिन्यासारखा प्रवास आहे, जिथे प्रत्येक पावलावर तुमचा दृष्टिकोन, जोखीम घेण्याची क्षमता आणि पैसे सांभाळण्याची पद्धत बदलत जाते.2 / 7होय, ₹५ लाख ते ₹५० कोटींच्या नेटवर्थपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास केवळ पैशांचा नाही, तर तो विचार, अनुशासन आणि संयमाचा देखील आहे. खरं सांगायचं तर, खरी समृद्धी तेव्हा येते जेव्हा पैसा केवळ गरज पूर्ण करण्याचं साधन न राहता, एक लिगसी बनवण्याचं माध्यम बनतो. तर, चला जाणून घेऊया आर्थिक स्वातंत्र्याचा हा ५-स्टेप फॉर्म्युला.3 / 7हा जीवनाचा सुरुवातीचा टप्पा अत्यंत आव्हानात्मक असतो, जिथे प्रत्येक महिन्याचा पगार संपताच पुढील पगाराची वाट पाहणं सुरू होतं. अशा वेळी अचानक वैद्यकीय खर्च, भाड्यात वाढ किंवा कोणताही अनपेक्षित खर्च समोर आल्यास, संपूर्ण बजेट कोलमडतं. त्यामुळे, या टप्प्यावर सर्वात मोठं लक्ष्य गुंतवणूक करणं नव्हे, तर आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार करणं हे असले पाहिजे. किमान ₹५०,००० ते ₹१ लाख पर्यंतची बचत अशी ठेवा, जी ३ ते ६ महिन्यांच्या आवश्यक खर्चांची काळजी घेऊ शकेल.4 / 7आता जीवन थोडे सोपं होतं, रोजच्या गरजा, किराणा, वीज बिल आणि छोट्या-छोट्या आनंदाचे क्षण सर्वकाही सहजपणे नियंत्रणात असतं. तुमची बचत आता एका लयीत येऊ लागते आणि पैशांवर नियंत्रण असल्याची भावना येते. या टप्प्यात लक्ष केंद्रित केले पाहिजे, ते म्हणजे उत्तम आर्थिक सवयी विकसित करण्यावर, जसं की एसआयपी (SIP) सुरू करणं, आरोग्य आणि टर्म इन्शुरन्स घेणं आणि अनावश्यक खर्चांपासून दूर राहणं. तरीसुद्धा, हा टप्पा नाजूक असतो; जर तुम्ही खूप मोठा ईएमआय (EMI) घेतला किंवा अनावश्यक खर्च वाढवला, तर तुम्ही सहजपणे मागील टप्प्यात परत जाऊ शकता.5 / 7आता जीवनात सुख-सुविधा वाढू लागतात, जसं की घर, गाडी आणि कुटुंबासोबत सुट्ट्या, हे सर्व आता शक्य होतं. या वेळी लक्ष 'सर्व्हायव्हल' पासून पुढे सरकून नियोजनावर केंद्रित होतं. तुम्ही मुलांचं शिक्षण, निवृत्ती निधी (Retirement Fund) आणि विविध प्रकारच्या पोर्टफोलिओवर (Diversified Portfolio) लक्ष देऊ लागता. गुंतवणुकीचं लक्ष्य आता केवळ बचत करणे राहत नाही, तर ते वाढ आणि सुरक्षा दोन्ही सुनिश्चित करू लागते, पण लक्षात ठेवा, या टप्प्यात जरी पैसे वाढत असले, तरी लक्ष विचलित करणारे घटक देखील वाढतात, आणि हाच सर्वात मोठा धोका असतो.6 / 7आता मासिक बजेटची चिंता संपते आणि लक्झरी कार, परदेश प्रवास, प्रीमियम हेल्थकेअर, बिझनेस क्लास प्रवास यांसारखे अनुभव सामान्य जीवनाचा भाग बनतात. या टप्प्यात खर्च करण्यावर नाही, तर संपत्तीच्या संरक्षणावर (Wealth Preservation) लक्ष केंद्रित केलं जातं. तसंच, टॅक्स ऑप्टिमायझेशन (Tax Optimization) आणि निष्क्रिय उत्पन्नाचे स्रोत (Passive Income Sources) निर्माण करणं सर्वात महत्त्वाचं ठरतं. आता तुमचं लक्ष्य पैसा केवळ वाढवणं नाही, तर तो दीर्घकाळ सुरक्षित ठेवणं हे असतं.7 / 7आता तुमची संपत्ती केवळ तुमच्यासाठीच नाही, तर पुढील पिढ्यांसाठी देखील काम करू लागते. तुमचं ध्येय एस्टेट प्लॅनिंग (Estate Planning), फॅमिली ऑफिस सेटअप आणि फिलान्थ्रॉपी (दान आणि समाजसेवा) यावर असतं. हा तो स्तर आहे, जिथे पैसा केवळ आरामाचे साधन न राहता, प्रभाव आणि वारसा याचे प्रतीक बनतो. जसे म्हटलं जातं — “आर्थिक स्वातंत्र्याचं रहस्य टप्प्यांना वगळण्यात नाही, तर प्रत्येक टप्प्यात प्रभुत्व मिळवण्यात आहे.”