ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
स्थायिक होण्यासाठी भारतीयांची 'या' ५ देशांना पसंती; श्रीमंत लोक सोडतायेत देश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:45 IST
1 / 6गेल्या काही वर्षांपासून श्रीमंत नागरिक भारत सोडत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. एका अहवालानुसार, २२ टक्के अति धनाढ्य लोकांना भारत सोडावा वाटतोय. कोटक प्रा.लि.ने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे.2 / 6सर्वेक्षणानुसार, अतिश्रीमंत लोकांना परदेशात राहणीमानाचा दर्जा, उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा मिळतात. तसेच इतर देशांमध्ये व्यवसाय करण्यास सुलभता या कारणांमुळे स्थायिक व्हायचे आहे.3 / 6१५० अतिश्रीमंत व्यक्तींमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अगदी संयुक्त अरब अमिराती (यूएई) त्यांच्या 'गोल्डन व्हिसा' योजनेमुळे या देशांना प्राधान्य दिले जात आहे.4 / 6परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी २५ लाख भारतीय इतर देशांमध्ये स्थायिक होण्यासाठी जातात. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी स्थलांतराच्या निर्णयाचे वर्णन 'भविष्यातील गुंतवणूक' म्हणून केले आहे.5 / 6भारतातील काही श्रीमंत लोकांना येथील उच्च कर आकारणीमुळे परदेशात स्थलांतरित होणे सोयीचे वाटते, जिथे कर आकारणी कमी आहे.6 / 6काही श्रीमंत लोक ग्लोबल नागरिकत्वाच्या फायद्यांसाठी परदेशात स्थलांतरित होतात, ज्यामुळे त्यांना अनेक देशांमध्ये प्रवास करणे आणि व्यवसाय करणे सोपे जाते.