1 / 10सध्या रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) यांसारख्या कंपन्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक राज्यांमध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनकडे पाहता ग्राहकांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये यासाठी काही प्लॅन्स आणले आहेत.2 / 10रिलायन्स जियोनं (Reliance jio) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांना ३०० मिनिट्स मोफत कॉलिंगची सेवा देण्याची घोषणा केली होती. दररोज १० मिनिटं याप्रमाणे ३० दिवसांकरिता कंपनीनं ३०० मिनिटं देण्याची घोषणा केली होती. 3 / 10याव्यतिरिक्त जिओनं आपल्या ग्राहकांसाठी Buy 1 Get 1 या ऑफरची सुरुवातही केली होती. या अंतर्गत ग्राहकांना जिओफोनच्या सहा रिचार्ज प्लॅनवर दुप्पट वैधता देण्यात येणार आहे.4 / 10यामध्ये रिचार्ज प्लॅन्स हे ३९ रूपये, ६९ रूपये, ७५ रूपये, १२५ रूपये, १५५ रूपये आणि १८५ रूपयांचे आहेत. जाणून घेऊया या प्लॅन्समध्ये ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा देण्यात येत आहेत.5 / 10३९ आणि ६९ रूपयांचे दोन्ही प्लॅन्स हे १४ दिवसांच्या वैधतेसह येतात. यामध्ये आता कंपनीनं दुप्पट वैधता म्हणजेच २८ दिवसांची वैधता देण्याचा निर्णय घेतला आहे. ३९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एमबी डेटा वापरण्यास मिळतो.6 / 10दुसरीकडे आता ६९ रूपयांच्या प्लॅनमध्येही ग्राहकांना ५०० एमबी डेटा दररोज मिळतो. या दोन्ही प्लॅनमध्ये आता दुप्पट डेटा देण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांना यात अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्सचं मोफत सबक्रिप्शनही मिळतं. 7 / 10७५ आणि १२५ रूपयांचे प्लॅन्स हे २८ दिवसांच्या वैधतेसह येतात. ७५ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १०० एमबी डेटा देण्यात येतो. तर १२५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ५०० एमबी डेटा मिळतो.8 / 10दोन्ही प्लॅन्ससह ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. सध्या सुरू असलेल्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता आणि दुप्पट डेटा देण्यात येत आहे. 9 / 10यापूर्वीच्या प्लॅन्सप्रमाणेच १५५ रूपये आणि १२५ रूपयांचे प्लॅन्सही २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. सध्या सुरू असलेल्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना यासोबत ५६ दिवसांची वैधता आणि दुप्पट डेटा देण्यात येतो.10 / 10१५५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा आणि १८५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा देण्यात येतो. दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येतं.