शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रतन टाटांचे मृत्यूपत्र हाय कोर्टात! संपत्तीची अद्याप वाटणीच होऊ शकली नाहीय, कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:21 IST

1 / 9
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यू पत्रातील तपशील समोर आला आहे. त्यांचे मृत्यूपत्र सध्या हायकोर्टात प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत आहे. ते लागू होण्यासाठी आणखी सहा महिने लागण्याची शक्यता आहे. अशातच रतन टाटांनी कोणा कोणाला काय काय दिले याची आकडेवारी समोर आली आहे.
2 / 9
टाटांच्या मृत्यूपत्राबाबत पुन्हा एकदा मोठा खुलासा समोर आला आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा एक मोठा भाग, ३८०० कोटी रुपये दानकर्मासाठी दिले आहेत. २३ फेब्रुवारी, २०२२ ला त्यांनी हे मृत्यूपत्र बनविले आहे.
3 / 9
रतन टाटा यांच्या संपत्तीचा मोठा भाग, ज्यामध्ये टाटा सन्सचे शेअर्स समाविष्ट आहेत, तो रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला दिला जाणार आहे.
4 / 9
टाटाच्या सेक्रेटरी दिलनाज गिल्डर यांना १० लाख रुपये व घरातील कर्मचारी आणि चालक (रतन टाटा कर्मचारी आणि चालक) - राजन शॉ आणि फॅमिली आणि सुब्बैया कोनार यांना अनुक्रमे ५० लाख आणि ३० लाख रुपये मिळतील.
5 / 9
टाटा समूहाच्या माजी सहाय्यक मोहिनी एम दत्ता यांना टाटांनी ८०० कोटी रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सावत्र बहिणी शिरीन आणि डियाना जीजीभॉय यांना उर्वरित संपत्तीतील समान वाटा देण्याचे सांगितले आहे.
6 / 9
रतन टाटा यांचा भाऊ जुहू येथील बंगला जिमी टाटा (८२) यांच्या वारसांना म्हणजेच सायमन टाटा आणि नोएल टाटा आणि इतर नातेवाईकांमध्ये विभागला जाणार आहे.
7 / 9
अलिबागमधील मालमत्ता जवळची मैत्रीण मेहली मिस्त्री यांच्याकडे सोपविण्यात यावी अशी इच्छा टाटा यांनी व्यक्त केली आहे.
8 / 9
लाडक्या पाळीव प्राण्यांच्या काळजीसाठी १२ लाख रुपये बाजूला काढून ठेवण्याचे मृत्यूपत्रात नमूद करण्यात आले आहे.
9 / 9
मृत्युपत्राची सत्यता सिद्ध करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयात प्रोबेटद्वारे हे मृत्यूपत्र सत्य आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे. यामुळे टाटांच्या संपत्तीच्या वाटणीसाठी न्यायालयाच्या प्रमाणीकरणाची वाट पहावी लागणार आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाHigh Courtउच्च न्यायालय