Rakesh Jhunjhunwala news: १३ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला झुनझुनवाला यांचा 'हा' शेअर; ६ महिन्यांत १०२ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 21:26 IST
1 / 6गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Market) उसळी पाहायला मिळत होती. परंतु मंगळवारी शेअर बाजारात थोडी घसरण दिसून आली. आयटी ट्रेनिंग सेवा (IT Training Services) कंपनी अॅप्टेक (Aptech) चा शेअर मंगळवारी बीएसईवर कामाकाजादरम्यान ९ टक्क्यांच्या तेजीसह ४०७ रूपयांवर पोहोचला होता. 2 / 6हा या शेअरचा १३ वर्षांतील उच्चांकी स्तर आहे. कंपनीच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. यादरम्यान या शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी दिसून आली होती. अॅप्टेकच्या बोर्डची ११ नोव्हेंबरला मीटिंग होणार आहे. यामध्ये आर्थिक वर्ष २०२२ च्या दुसऱ्या तिमाहितील निकालांना मंजुरी देण्यात येईल.3 / 6बीएसईच्या आकडेवारीनुसार दिग्गज गुंतवणूकदार (Investor) राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा अॅप्टेक कंपनीत १२.५० टक्क्यांचा आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांचा कंपनीत ११.२२ टक्क्यांचा हिस्सा आहे.4 / 6याचाच अर्थ झुनझुनवाला दांपत्याकजे या कंपनीतील एकूण २३.७२ टक्के हिस्सा आहे. तर दुसरीकडे RARE Equity Private Limited चा कंपनीमध्ये २०.७१ टक्के हिस्सा आहे.5 / 6कंपनीचा शेअर जानेवारी २००८ नंतर उच्चांकी स्तरावर ट्रेड करत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये हा शेअर ४०३.९३ रूपयांच्या स्तरावर पोहोचला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २००७ मध्ये या शेअरनं आपली आजवरची ४४९ रूपयांची उच्चांकी पातळी गाठली होती.6 / 6गेल्या सहा महिन्यांमध्ये अॅप्टेकच्या शेअरमध्ये १०२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यादरम्यान बीएसई सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) २२.७ टक्क्यांची तेजी आली आहे. सप्टेंबरमध्ये अॅप्टेकनं अॅडटेक सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता.