1 / 6 शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना या या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या मालमत्तेत सुमारे 25% घट झाली आहे. 2 / 6 Trendlyne च्या डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती जून 2022 मध्ये 24.67 टक्क्यांनी घसरून 25,425.88 कोटी रुपये झाली आहे. 3 / 6 जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 33,753.92 कोटी रुपयांपर्यंत वाढली होती. म्हणजेच गेल्या तिमाहीत त्यांचे एकूण 8,328.04 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.4 / 6 राकेश झुनझुनवाला यांची 33 सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वात जास्त पैसा टायटनमध्ये गुंतवला आहे. 5 / 6 राकेश झुनझुनवाला यांनी या कंपनीत 8,728.9 कोटी रुपये, स्टार हेल्थमध्ये 4,755.2 कोटी रुपये आणि मेट्रो बँडमध्ये 2,431.8 कोटी रुपये गुंतवले आहेत. बिग बुलने टाटा मोटर्समध्ये 1,619.8 कोटी रुपये आणि क्रिसिलमध्ये 1315 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.6 / 6 कोणते स्टॉक घसरले? डेल्टा कॉर्प आणि नेटवर्क 18 चे शेअर्स या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 48% कमी झाले आहेत. दुसरीकडे, इंडियाबुल्सच्या शेअरच्या किमतीत 45%, नाल्को 44% आणि इंडियाबुल्स फायनान्स 43% ने घसरले. याशिवाय अॅपटेक, डिशमन कार्बोजेन, स्टार हेल्थ यांसारख्या समभागात 31 ते 40% घसरण झाली.