किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 00:25 IST
1 / 5सोने खरेदी भारतात आता सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर जाऊ लागले आहे. सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहचल्या. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी सोने खरेदीवर वाढलेल्या किंमतीचा परिणाम झाला आहे.2 / 5मागील तीन महिन्यात भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात घटली आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. खरेदी १६ टक्क्यांनी घसरली आहे. तीन महिन्यात सोने खरेदी २०९.४० टनांपर्यंतच राहिली.3 / 5वर्ल्ड गोल्ड परिषदेच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी म्हणजे जुलै ते सप्टेंबर २०२४ मध्ये भारतात २४८.३ टन सोने खरेदी झाली होती. वाढल्या किंमतीचा फटका सोन्याच्या खरेदीला बसला आहे. टनांमध्ये सोने खरेदी घटली असली, तर रुपयांमध्ये ती वाढली आहे.4 / 5म्हणजे गेल्यावर्षी १ लाख ६५ हजार ३८० कोटी रुपयांचे सोने खरेदी केले गेले होते. यावर्षी २ लाख ३ हजार २४० कोटी रुपयांची सोने खरेदी झाली. रुपयांमध्ये बघायचे झाले तर सोने खरेदी २३ टक्यांनी वाढली आहे. टनांमध्ये कमी खरेदी दिसत असली तरी वाढलेल्या किंमतींमुळे रुपयांमध्ये ही वाढ जास्त आहे.5 / 5वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचे भारताचे सीईओ सचिन जैन यांनी सांगितले की, भारतात लोकांमध्ये सोने हा गुंतवणुकीचा पर्याय बनला आहे. वजनामध्ये सोन्याच्या खरेदी १६ टक्के घसरण झाली आहे. पण, रुपयांमध्ये ती २३ टक्क्यांनी वाढली आहे. महागाई आणि कमाई यांच्यात ताळमेळ घालून भारतीय सोने खरेदी करत आहेत.