शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुद्दलापेक्षा अधिक व्याज देईल पोस्टाची ही स्कीम, १० लाख जमा कराल तर मिळेल २० लाखांपेक्षा अधिक इंटरेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:22 IST

1 / 6
Post Office FD: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही अनेक योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही त्यापैकीच एक. सामान्य भाषेत आपण याला पोस्ट ऑफिस एफडी म्हणतो. पोस्ट ऑफिसमध्ये १ ते ५ वर्षांच्या मुदतीच्या एफडीचे पर्याय उपलब्ध आहेत. बँक ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे. इन्कम टॅक्स अॅक्ट ८० सी अंतर्गत तुम्हाला टॅक्स बेनिफिट्सही मिळतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या योजनेवर फक्त व्याजातून मूळ रकमेपेक्षा दुप्पट कमाई करू शकता आणि मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करू शकता.
2 / 6
पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे पैसे तिप्पट करण्यासाठी तुम्हाला ५ वर्षांची एफडी निवडावी लागेल. आपल्याला या योजनेत गुंतवणूक करावी लागेल आणि ती मॅच्युअर होण्यापूर्वी ती वाढवावी लागेल. हे एक्सटेन्शन तुम्हाला सलग २ वेळा करावं लागेल म्हणजेच तुम्हाला ही एफडी १५ वर्षे चालवावी लागेल.
3 / 6
जर तुम्ही या एफडीमध्ये १० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ७.५ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला ५ वर्षात या रकमेवर ४,४९,९४८ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे एकूण रक्कम १४,४९,९४८ रुपये होईल. पण जर तुम्ही या योजनेला ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली तर तुम्हाला फक्त व्याज म्हणून ११,०२,३४९ रुपये मिळतील आणि १० वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम २१,०२,३४९ रुपये होईल. ती मॅच्युअर होण्यापूर्वी आपल्याला आणखी एकदा मुदत वाढवावी लागेल. अशा तऱ्हेनं १५ व्या वर्षी तुम्हाला १० लाखांच्या गुंतवणुकीवर फक्त व्याज म्हणून २०,४८,२९७ रुपये मिळतील.
4 / 6
अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ३०,४८,२९७ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला तुमच्या मुद्दलापेक्षा दुप्पट व्याज मिळेल आणि तुमची रक्कम तिप्पट होईल.
5 / 6
अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ३०,४८,२९७ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला तुमच्या मुद्दलापेक्षा दुप्पट व्याज मिळेल आणि तुमची रक्कम तिप्पट होईल.
6 / 6
पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या एफडीवर वेगवेगळं व्याज मिळतं. १ वर्षाच्या एफडीवर ६.९० टक्के, २ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१० टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५० टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक