Post Office च्या 'या' स्कीममध्ये केवळ व्याजातूनच मिळतील ९०००० रुपये, सरकार देतेय 'गॅरेंटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 09:02 IST
1 / 6Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी गुंतवणूकीच्या अनेक स्कीम ऑफर करत आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना निश्चित परतावाही मिळतो. कोणत्याही जोखमीशिवाय यामध्ये निश्चित परतावा मिळत असतो. पोस्ट ऑफिसच्या अशा योजनांपैकी एक म्हणजे टाइम डिपॉझिट.2 / 6पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही ९० हजार रुपयांचे व्याजाद्वारे उत्पन्न मिळवू शकता. याची हमी सरकार देते. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत ६.९ टक्के ते ७.५ टक्के व्याजदर उपलब्ध आहेत. या योजनेत तुम्ही २ लाख रुपये एकत्र जमा केल्यास पाच वर्षानंतर तुम्हाला सुमारे ९० हजार रुपयांचं व्याज मिळू शकतं. 3 / 6इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खातं ४ वेगवेगळ्या कालावधीसाठी उघडलं जाऊ शकतं. योजनेअंतर्गत १ वर्षासाठी ६.९%, २ वर्षांसाठी ७%, ३ वर्षांसाठी ७.१% आणि ५ वर्षांसाठी ७.५% व्याज दिलं जात आहे. यामध्ये व्याजाची गणना दर तीन महिन्यांनी केली जाते. परंतु व्याजाची रक्कम दरवर्षी दिली जाते. यामध्ये तुम्ही किमान १ हजार रुपये गुंतवू शकता.4 / 6पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदारानं या योजनेत ५ वर्षांसाठी २ लाख रुपये जमा केले तर त्याला एकूण ८९,९९० रुपये व्याज मिळेल. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला मुद्दल आणि व्याज परत मिळेल. 5 / 6एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वार्षिक आधारावर मिळणारी व्याजाची रक्कम जरी काढली नाही तरीही ती डेड मनीप्रमाणे तुमच्या खात्यात राहील. यावर वेगळं व्याज मिळणार नाही.6 / 6पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खातं ५ वर्षांसाठी उघडल्यास त्यावर कर सवलती देखील मिळतात. 80C अंतर्गत गुंतवणुकीवर सूट मिळते. या योजनेच्या इतर फीचर्सबद्दल सांगायचं झाल्यास यात सिंगल किंवा जॉईंट अकाऊंट सुरू करता येतं. एकदा गुंतवणूक केली की, प्री-मॅच्युअर क्लोजर किमान ६ महिन्यांनंतरच करता येते.