By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 21:16 IST
1 / 7 Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले असेल किंवा तुम्ही एखादी योजना घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 35 लाख रुपयांचा फायदा मिळू शकतो.2 / 7 ग्राम सुरक्षा योजना(Gram Suraksha Scheme)- देशातील अनेकजण पोस्ट ऑफिसला आजही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानतात. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला प्रचंड फायदे मिळतात.3 / 7 1500रुपयांच्या बदल्यात मिळणार 35 लाख- पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही एक प्रकारची विमा योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा केवळ 1500 रुपये गुंतवावे लागतील आणि त्या बदल्यात तुम्हाला 35 लाख रुपये मिळतील.4 / 7 काय आहे या योजनेची खासियत? ही पोस्ट ऑफिसची सरकारी विमा योजना आहे. 19 ते 55 वयोगटातील कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 रुपये आणि कमाल 10 लाख रुपये आहे. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियमची सुविधा.5 / 7 कर्जही उपलब्ध आहे- विशेष म्हणजे, या योजनेवर तुम्हाला कर्जाचा लाभही मिळतो. याशिवाय तुम्हाला कर्ज विम्याची सुविधाही मिळते. पॉलिसी घेतल्यानंतर 4 वर्षांनीच तुम्ही कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकता.6 / 7 35 लाख कसे मिळणार? जर तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये मासिक प्रीमियम मिळेल.7 / 7 31.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ 55 वर्षांसाठी उपलब्ध असेल. 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ असेल. 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ 60 वर्षांसाठी उपलब्ध असेल. विशेष म्हणझे, 3 वर्षानंतरच तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकता.