पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
By जयदीप दाभोळकर | Updated: September 13, 2025 08:47 IST
1 / 7Post Office Investment: सध्या गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही मोठा फंड नक्कीच जमा करू शकता. लाखो भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात, ते बचतीसाठी हा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानतात. येथे उपलब्ध असलेल्या योजना पूर्णपणे सुरक्षित मानल्या जातात कारण त्यांना सरकारकडून हमी दिली जाते. 2 / 7मुलांपासून, महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, सर्वांसाठी पोस्ट ऑफिसच्या अनेक जबरदस्त योजना आहेत, या यादीत पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना समाविष्ट आहे, जी गुंतवणुकीच्या बाबतीत खूप आश्चर्यकारक मानली जाते. 3 / 7पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांपैकी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सर्वात प्रसिद्ध आहे. दीर्घकाळासाठी सुरक्षित बचत करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सध्या या योजनेवर ७.१% वार्षिक व्याज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम दोन्ही करमुक्त आहेत. पीपीएफमध्ये दरवर्षी किमान ₹५०० आणि जास्तीत जास्त ₹१.५ लाख गुंतवणूक करता येते. तथापि, त्याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे, म्हणजेच मॅच्युरीटीपूर्वी संपूर्ण रक्कम काढणं शक्य नाही.4 / 7पीपीएफ योजना दीर्घकाळ सतत गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा देते. म्हणून जर एखाद्या व्यक्तीनं दरमहा ₹१२,५०० ची गुंतवणूक केली तर १५ वर्षांमध्ये एकूण जमा रक्कम ₹२२.५ लाख होईल. सध्याच्या ७.१% व्याजदराच्या आधारे, सुमारे ₹१७.४७ लाख अतिरिक्त व्याज मिळेल, म्हणजेच, त्यानुसार, मॅच्युरिटीवर एकूण रक्कम सुमारे ₹४० लाख होईल. या योजनेत, गुंतवणूकदार त्यांच्या क्षमतेनुसार गुंतवणूक रक्कम वाढवू किंवा कमी करू शकतात.5 / 7पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना ही केवळ दीर्घकालीन बचतच नाही तर गरजेच्या वेळी आधार देखील आहे. खातं उघडल्यानंतर एक वर्षानंतर कर्ज घेण्याची सुविधा यामध्ये दिली जाते. यासोबतच, पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेत अंशतः पैसे काढण्याची परवानगी आहे आणि यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पैशांची कमतरता भासत नाही.6 / 7पीपीएफ ही सुरक्षितता, कर लाभ आणि दीर्घकालीन पैसे कमविण्याची क्षमता यांचं उत्तम कॉम्बिनेशन आहे. म्हणूनच कोट्यवधी भारतीय अजूनही ते त्यांच्या बचत आणि गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग मानतात. 7 / 7(टीप: यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा कोणत्याही प्रकारे गुंतवणूक सल्ला म्हणून विचारात घेऊ नये, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)