टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:12 IST
1 / 8पोस्ट ऑफिसची PPF योजना सरकारी हमीसह येते, ज्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि दीर्घकाळात नियमित बचत करून लाखोंचा मोठा फंड तयार करता येतो.2 / 8जर तुम्ही दर महिन्याला फक्त ₹१२,५०० रुपये PPF मध्ये जमा केले, तर १५ वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर तुमचा एकूण फंड अंदाजे ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.3 / 8या योजनेवर सध्या वार्षिक सुमारे ७.१% दराने व्याज मिळते. महत्त्वाचे म्हणजे, या व्याजाच्या रकमेवर कोणताही कर लागत नाही, ज्यामुळे हा पर्याय कर वाचवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम आहे.4 / 8सामान्य माणूसही या योजनेचा लाभ घेऊ शकेल यासाठी तुम्ही अगदी कमी म्हणजे ₹५०० रुपयांपासून यामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.5 / 8तुमच्या सोयीनुसार तुम्ही दर महिना किंवा वार्षिक गुंतवणूक करू शकता. एका आर्थिक वर्षात तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख पर्यंतची रक्कम PPF मध्ये जमा करू शकता.6 / 8PPF मधील गुंतवणूक १५ वर्षांसाठी लॉक-इन असते, ज्यामुळे दीर्घकालीन बचत होते. मॅच्युरिटीनंतर तुम्ही ही योजना ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता.7 / 8गुंतवणूक केल्यानंतर १ वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही PPF खात्यातून कर्ज घेऊ शकता, तसेच ५ वर्षांनंतर गरज पडल्यास आंशिक पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.8 / 8EPF प्रमाणेच PPF मध्ये केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र ठरते, ज्यामुळे तुम्हाला दुहेरा फायदा मिळतो.