शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:22 IST

1 / 7
भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची असते. परंतु ती गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं तितकंच आवश्यक असतं. जर तुम्हाला कोणताही धोका न पत्करता पैसे वाढवायचे असतील तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंगसर्टिफिकेट (एनएससी) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही एक सरकारी हमी योजना आहे, जी ५ वर्षात मॅच्युअर होते.
2 / 7
जर तुमच्याकडे निवृत्तीचे पैसे असतील किंवा तुमच्याकडे मोठा निधी असेल किंवा मोठी एकरकमी रक्कम असेल तर ती एनएससीमध्ये गुंतवून तुम्ही चांगले व्याज मिळवू शकता. यामध्ये परतावा निश्चित असतो आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रं जमा करून तुम्ही खातं उघडू शकता.
3 / 7
कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. आपण एकट्यानं खातं उघडू शकता किंवा आपण इच्छित असल्यास संयुक्त खातं देखील उघडू शकता. ज्यात जास्तीत जास्त ३ प्रौढ सहभागी होऊ शकतात. १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची मुलंही स्वत:चं खातं उघडू शकतात. जर मूल लहान असेल किंवा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर त्याचे पालक त्याच्या नावानं खातं उघडू शकतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला नॉमिनी बनवू शकता. या योजनेत तुम्ही हवी तितकी खाती उघडू शकता.
4 / 7
किमान गुंतवणूक फक्त १,००० रुपये आहे आणि कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सूट मिळण्यास पात्र आहे. तुम्ही एका वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंत करमुक्त गुंतवणूक करू शकता.
5 / 7
सध्या या योजनेवर वार्षिक ७.७ टक्के व्याज मिळतंय. सरकार यामध्ये वेळोवेळी बदल करत असतं. व्याजाची रक्कम ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच दिली जाते. पहिल्या ४ वर्षांचे व्याज पुन्हा गुंतवले जाते, जे करमुक्त आहे, परंतु ५ व्या वर्षाचं व्याज करपात्र आहे.
6 / 7
जर तुम्हाला कधी पैशांची गरज असेल तर तुम्ही तुमची एनएससी, बँक किंवा एनबीएफसीला गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमची बचत मोडावी लागणार नाही आणि पैशांची व्यवस्थाही करता येईल. तथापि, गुंतवणूकदाराचा मृत्यू किंवा न्यायालयाचा आदेश यासारख्या काही विशिष्ट परिस्थिती वगळता खातं ५ वर्षांच्या आधी बंद केलं जाऊ शकत नाही.
7 / 7
पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर संयुक्त खातं उघडून त्यांना अधिक फायदा मिळू शकतो. समजा तुम्ही दोघांनी मिळून ९ लाख रुपये गुंतवले तर ५ वर्षांनंतर तुम्हाला जवळपास १३,०४,१३० रुपये मिळतील. यापैकी ४,०४,१३० रुपये व्याज म्हणून असतील. एकंदरीत, ज्यांना कमी जोखमीवर सरकारी हमीसह सुरक्षित परतावा हवा आहे त्यांच्यासाठी ही योजना योग्य आहे. पोस्ट ऑफिस एनएससी केवळ पैसे वाढवत नाही तर कर वाचविण्यास देखील मदत करते.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक