शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:46 IST

1 / 7
पण, ही ऑफर स्वीकारण्यापूर्वी काही अटी समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हे घर घेऊन त्याचं नूतनीकरण करावं लागेल आणि तिथे बराच काळ राहावं लागेल.
2 / 7
अम्बर्ट हे सुमारे ६,५०० लोकसंख्या असलेलं शांत शहर आहे, जे ल्योनपासून सुमारे १३४ किलोमीटर पश्चिमेला आहे. गेल्या काही वर्षांपासून इथली लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे आणि अनेक वस्त्यांमध्ये ६०% पेक्षा जास्त घरं रिकामी आहेत.
3 / 7
शहराला पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि नवीन रहिवाशांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ५ वर्षांची योजना आखली आहे. लोकांना इथे स्थायिक होऊन व्यवसाय सुरू करता यावा आणि शाळांमध्ये पुन्हा मुलांची संख्या वाढावी, यासाठी ही घरं १ युरोला दिली जात आहेत.
4 / 7
ही ऑफर आकर्षक असली तरी, ती एक मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला हे घर पूर्णपणे नव्याने बांधावं लागेल, म्हणजे बाहेरील भिंतींपासून ते आतील सजावटीपर्यंत सर्व काही आधुनिक पद्धतीनं करावं लागेल.
5 / 7
इटलीतील अशाच योजनांवर आधारित अंदाजानुसार, या दुरुस्तीचा खर्च सुमारे २०,००० ते ५०,००० युरो (सुमारे १८ ते ४५ लाख रुपये) येऊ शकतो. शिवाय, काम वेळेत सुरू करून स्थानिक नियमांनुसार पूर्ण करावं लागेल.
6 / 7
या योजनेसाठी परदेशी नागरिक आणि फ्रेंच नागरिक दोघेही अर्ज करू शकतात. मात्र, काही अटी आहेत: तुम्हाला घरात किमान ३ वर्षं राहणं बंधनकारक आहे. फ्रेंच भाषेचं ज्ञान आवश्यक नसलं तरी, स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी ते फायदेशीर ठरेल. अर्ज तुम्ही अम्बर्टच्या टाउन हॉलमधून करू शकता.
7 / 7
ही योजना अधिक सोपी करण्यासाठी, स्थानिक प्रशासन कमी व्याजदराचे कर्ज आणि नूतनीकरणासाठी अनुदान देखील देत आहे. यामुळे खरेदीदारांना आर्थिक मदत मिळेल आणि घरांची दुरुस्ती चांगल्या दर्जाची होईल.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनInvestmentगुंतवणूकFranceफ्रान्स