ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:23 IST
1 / 8ऑनलाइन गेमिंग उद्योगासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग संवर्धन आणि नियमन विधेयक २०२५' मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकात 'रियल मनी गेम्स' म्हणजेच वास्तविक पैशांच्या खेळांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. '2 / 8रियल मनी गेम्स' अशा खेळांना म्हटले जाते, जिथे खेळाडू बक्षिसे जिंकण्याच्या अपेक्षेने पैसे जमा करतात. यासोबतच, अशा खेळांच्या जाहिरातींवरही बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.3 / 8सरकारचा उद्देश ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या सट्टेबाजी आणि जुगारावर नियंत्रण आणण्याचा आहे. मात्र, या विधेयकामुळे देशातील अनेक लोकप्रिय भारतीय गेमिंग ॲप्स आणि प्लॅटफॉर्म्सच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता हे विधेयक राज्यसभेत मतदान आणि चर्चेसाठी पाठवले जाईल. त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक कायद्यात रूपांतरित होईल.4 / 8यात आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान लोकप्रिय झालेले ड्रीम११ आणि माय११ सर्कल सारख्या भारतीय गेमिंग ॲप्सवरही परिणाम होणारआहे. 5 / 8ड्रीम११ हे एक मोठे फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म आहे. यावर वापरकर्ते आपली व्हर्च्युअल टीम तयार करतात. खेळाडूंच्या वास्तविक कामगिरीनुसार पॉइंट्स मिळतात आणि ज्यांच्या टीमला जास्त पॉइंट्स मिळतात, ते जिंकतात. हे ॲप 'सबस्क्रिप्शन मॉडेल'वर चालते, ज्यात पैशांचे व्यवहार होतात. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यास, ड्रीम११ सारख्या प्लॅटफॉर्मचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गुगल प्ले स्टोरवर याला १० कोटींहून अधिक लोकांनी डाउनलोड केले असून, याची रेटिंग ४.५/५ आहे.6 / 8ड्रीम११ प्रमाणेच my 11 circle देखील एक फँटसी स्पोर्ट्स ॲप आहे. याला 'कौशल्य-आधारित खेळ' मानले जाते, ज्यात खेळाडूंच्या ज्ञानानुसार जिंकण्याची शक्यता असते. यामध्येही प्रवेश शुल्क आकारले जाते आणि विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातात. त्यामुळे हा कायदा लागू झाल्यास, हे ॲपही बेकायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. गुगल प्ले स्टोरवर याचे ५ कोटींहून अधिक डाउनलोड आहेत.7 / 8टिकटॉक स्किल्स गेम्सद्वारे तयार करण्यात आलेले हे एक मल्टि-गेम्स प्लॅटफॉर्म असून, ते देखील 'रियल-मनी' फॉरमॅटवर आधारित आहे. यावर कार्ड गेम्स, कॅज्युअल गेम्स आणि क्विजच्या माध्यमातून रोख बक्षिसे जिंकण्याची संधी मिळते. प्ले लुडो ऑनलाईन गेमचे गुगल प्ले स्टोरवर एका खेळाचे ५ कोटींहून अधिक डाउनलोड आहेत.8 / 8याशिवाय, हाऊझॅट, जंगली रम्मी, जंगली पोकर, रम्मी सर्कल, पोकरबाझी, नजारा टेक्नॉलॉजीज आणि माय टीम११ सारख्या अनेक गेमिंग प्लॅटफॉर्मवर या विधेयकामुळे संकटाचे सावट निर्माण झाले आहे.