शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वयाच्या ३५व्या वर्षी दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक; निवृत्तीसाठी किती पैसे जमा होतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:51 IST

1 / 6
जर तुम्ही वयाच्या ३५व्या वर्षी या योजनेत दरमहा ५,००० रुपये योगदान देण्यास सुरुवात केली. तर निवृत्तीनंतर तुम्हाला किती रुपयांची पेन्शन मिळेल? याचं गणित आज समजून घेऊ.
2 / 6
NPS ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, म्हणजेच तुमचे पैसे शेअर बाजारातील विविध योजनांमध्ये गुंतवले जातात. परिणामी त्याचा परतावा बाजारानुसार ठरवला जातो. या योजनेत २ प्रकारची खाती आहेत, टियर १ आणि टियर २. कोणतीही व्यक्ती टियर १ खाते उघडू शकते. परंतु, टियर-२ खाते फक्त जर तुमच्याकडे टियर-१ खाते असेल तरच उघडता येते.
3 / 6
NPS मध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम तुम्ही ६० वर्षांचे झाल्यानंतर एकरकमी घेऊ शकता, म्हणजेच एक प्रकारे ही रक्कम तुमचा निवृत्ती निधी आहे. तर तुम्हाला किमान ४० टक्के निधी फंडात ठेवावा लागतो. यातूनच तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळतो. तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या ॲन्युइटीवर अवलंबून आहे.
4 / 6
तुम्ही वयाच्या ३५व्या वर्षापासून एनपीएसमध्ये दरमहा ५,००० रुपये गुंतवले. ही गुंतवणूक वयाच्या ६० वर्षांपर्यंत कायम ठेवली. तर तुमची एकूण २५ वर्ष गुंतवणूक होईल. या प्रकरणात तुमची एकूण १५,००,००० रुपयांची गुंतवणूक होईल.
5 / 6
जर तुम्हाला १०% परतावा मिळाला तर तुम्हाला ४७,१७,५७३ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुमचा एकूण निधी ६२,१७,५७३ रुपये होईल.
6 / 6
तुम्ही या रकमेपैकी ४०% रक्कम गुंतवल्यास, तुम्हाला २४,८७,०२९ रुपये वार्षिकीमध्ये गुंतवावे लागतील. अशा परिस्थितीत, वयाच्या ६०व्या वर्षी, तुम्ही एकरकमी ३७,३०,५४४ रुपये निवृत्ती निधी म्हणून घेऊ शकता. जर तुम्हाला ॲन्युइटीवर ७ टक्के परतावा मिळत असेल तर तुम्ही दरमहा १४,५०८ रुपये पेन्शन म्हणून घेऊ शकता.
टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार