UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:26 IST
1 / 8आतापर्यंत ग्राहकांना त्यांचे वेगवेगळे ऑटो-पेमेंट्स ट्रॅक करण्यासाठी प्रत्येक स्वतंत्र ॲप तपासावे लागत होते. आता मात्र, कोणत्याही यूपीआय ॲपच्या ‘मॅनेज बँक अकाउंट’ विभागात जाऊन सर्व सक्रिय ऑटो-पे मेंडेट्स एकाच ठिकाणी पाहता येतील आणि तेथूनच ते बंद किंवा मॅनेज करता येतील.2 / 8एनपीसीआयने जारी केलेल्या ७ ऑक्टोबर २०२५ च्या परिपत्रकानुसार, सर्व बँका आणि यूपीआय ॲप्सना हे नवीन नियम लागू करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२६ पासून नवीन प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होईल.3 / 8ज्याप्रमाणे आपण मोबाईल नंबर पोर्ट करतो, अगदी त्याच धर्तीवर आता ग्राहक आपले सुरू असलेले ऑटो-पे मेंडेट एका यूपीआय ॲपवरून दुसऱ्या ॲपवर सहज ट्रान्सफर (पोर्ट) करू शकतील. यामुळे एखादे ॲप आवडत नसल्यास ग्राहकाला सेवा बदलणे सोपे होईल.4 / 8कोणताही ऑटो-पे मेंडेट बदलण्यासाठी, अपडेट करण्यासाठी किंवा पोर्ट करण्यासाठी आता 'यूपीआय पिन' व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणताही बदल करणे सायबर भामट्यांना अशक्य होईल.5 / 8जर एखाद्या व्यापाऱ्याने किंवा कंपनीने त्यांचा पेमेंट गेटवे किंवा यूपीआय आयडी बदलला, तरीही ग्राहकांना पुन्हा नवीन मेंडेट सेट करण्याची गरज पडणार नाही. ही प्रक्रिया बॅकएंडला आपोआप पार पडेल, ज्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचेल.6 / 8अनेक कंपन्या ग्राहकांना कॅशबॅकचे आमिष दाखवून किंवा वारंवार नोटिफिकेशन्स पाठवून आपले प्लॅटफॉर्म बदलण्यास भाग पाडतात. नवीन नियमांनुसार, कोणत्याही ग्राहकाला अशा प्रकारे आपला मेंडेट पोर्ट करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही.7 / 8३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू असलेले सर्व जुने ऑटो-पेमेंट्स कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालू राहतील. नवीन वर्षात जुन्या पेमेंट्सना नवीन सुरक्षा चौकटीत आणले जाईल, मात्र तोपर्यंत ग्राहकांची सेवा खंडित होणार नाही.8 / 8अनेकदा लोक सबस्क्रिप्शन घेऊन विसरून जातात आणि पैसे कटत राहतात. आता सर्व मेंडेट्स समोर दिसणार असल्याने, नको असलेले सबस्क्रिप्शन बंद करणे सोपे होईल. यामुळे डिजिटल व्यवहारांमधील पारदर्शकता वाढून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक टाळता येईल.