शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:56 IST

1 / 8
आजकाल, अनेकांना आपण लवकर निवृत्त व्हावं असं वाटत असतं. परंतु यासाठी जास्त उत्पन्न, मोठा व्यवसाय किंवा वेगानं वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक मानलं जातं. पण असं नाहीये, कारण जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुम्ही या मोठ्या पर्यायांशिवायही स्वतःसाठी कोट्यवधींचा निधी उभा करू शकता. तर मग कोणत्या प्रकारच्या नियोजनामुळे हे शक्य होऊ शकतं ते जाणून घेऊया.
2 / 8
आपण आपल्या पगाराच्या १०-२०% बचत करतो आणि आनंदी होतो. पण त्याऐवजी तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या ५०% पेक्षा जास्त बचत केली पाहिजे. महागड्या गाड्या, नवीन फोन आणि वीकेंड पार्ट्यांवर पैसे खर्च करण्याऐवजी, तुमची जीवनशैली साधी ठेवा. याचा अर्थ असा की आज वाचवलेला प्रत्येक रुपया भविष्यात मोठी रक्कम उभी करुन देईल.
3 / 8
हा दुसरा गोल्डन नियम आहे की तुम्ही तुमच्या कौशल्यांवर काम करायला हवं. बढती मिळवावी आणि चांगल्या पगारासाठी नोकरी बदलावी. पण तुमचा पगार वाढला की खर्च वाढवू नका. तुमच्या वाढलेल्या पगाराचा जवळजवळ संपूर्ण भाग थेट गुंतवणुकीत जाऊ द्या. याला 'लाइफस्टाइल इन्फ्लेशन' टाळणं म्हणतात, जिथे बहुतेक लोक त्यांचा पगार वाढताच त्यांचे खर्च वाढवतात आणि त्यामुळे ते त्याच ठिकाणी राहतात.
4 / 8
जर तुम्हाला मोठी रक्कम जोडायची असेल तर तुम्ही रातोरात श्रीमंत बनवणाऱ्या स्टॉक किंवा 'मल्टी-बॅगर' टिप्सच्या मागे धावण्याऐवजी, असा पर्याय निवडा जो तुम्हाला दीर्घकाळात पैसे देईल. तुम्ही इंडेक्स फंडमध्ये एसआयपी सारखा पर्याय निवडू शकता. जर तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही सहजपणे ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता.
5 / 8
यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाची चादू मदत करू शकते. तुमचं ४.७ कोटी रुपयांचं टार्गेट आहे. एसआयपीमध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळतो असं तत्ज्ञांचं मत आहे. जर तुम्ही २३ वर्षांपासून गुंतवणूकीला सुरुवात केली आणि तुम्हाला ४५ मध्ये रिटायर व्हायचंय असं समजू.
6 / 8
यासाठी तुम्हाला दरमाहा ३५ हजारांची गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक तुम्हाला २२ वर्षांसाठी ठेवावी लागेल. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक ९२.४ लाख रुपये असेल. तर तुम्हाला व्याजापोटी ३.७७ कोटी रुपये मिळू शकतील. म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्हाला ४.७ कोटींची रक्कम मिळू शकते.
7 / 8
निवृत्तीनंतर श्रीमंत होण्यासाठी, दरमहा तुमच्या कमाईचा काही भाग इंडेक्स फंडमध्ये गुंतवण्यास सुरुवात करू शकता. शक्य तितके क्रेडिट कार्ड कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या जाळ्यातून स्वतःला वाचवा, कारण ते तुमचं उत्पन्न वाळवीसारखं खाऊन टाकतात.
8 / 8
(टीप: हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आलेला आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा