मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार कुटुंब; ५०००० कोटींच्या भूमिचे मालक; तुमच्या घरातही मिळतील यांच्या वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:17 IST
1 / 7मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. येथे मालमत्तेचे दर गगनाला भिडले आहेत. या शहरात साधं वनआरके घ्यायचं म्हटलं तरी सर्वसामान्यांना घाम फुटतो. जमीन खरेदी करण्याचा तर विषयच काढायला नको. पण, तुम्हाला माहिती आहे का? मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार कोण आहेत? ज्यांच्याकडे तब्बल ३५०० एकर जमीन आहे. एसआरएच्या सर्व्हेक्षणानुसार, या कुटुंबाकडे शहरातील १० टक्के जमीन आहे. 2 / 7तुमच्या आमच्या घरातही यांच्या कंपनीची एकतरी वस्तू नक्कीच असेल. आम्ही बोलत आहोत, गोदरेज कुटुंबाबद्दल. मुंबईतील विक्रोळी परिसरातील एसआरए सर्वेक्षणानुसार, टॉप जमीन मालकांच्या यादीत गोदरेज कुटुंबाचाही समावेश आहे. ज्यांच्याकडे ३,४०० एकरपेक्षा जास्त जमीन आहे. सर्वेक्षणानुसार, ही जमीन विक्रोळीतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे.3 / 7गोदरेज कुटुंब हे भारतातील एक प्रतिष्ठित पारशी कुटुंब आहे. या कुटुंबाचा इतिहास १०० वर्षांहून अधिक जुना आहे. गोदरेज ग्रुपची स्थापना १८९७ मध्ये अर्देशीर गोदरेज आणि त्यांचे भाऊ पिरोजशा बुरजोरजी गोदरेज यांनी केली होती.4 / 7हा व्यवसाय ग्रुप विविध क्षेत्रात काम करतो. यामध्ये रिअल इस्टेट, ग्राहक उत्पादने आणि औद्योगिक अभियांत्रिकीसह अनेक कामे समाविष्ट आहेत. प्रत्येक भारतीय घरात गोदरेजची एकतरी वस्तू नक्कीच पाहायला मिळते.5 / 7गोदरेज कुटुंबाने २०२४ मध्ये त्यांचा १२७ वर्षांचा व्यवसाय दोन भागात विभागला. गोदरेज इंडस्ट्रीज आणि गोदरेज एंटरप्रायझेस नावाच्या २ स्वतंत्र संस्था स्थापन केल्या. ही विभागणी आदि गोदरेज आणि त्याचा भाऊ नादिर (एका बाजूला) आणि त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा (दुसऱ्या बाजूला) यांच्यात झाली.6 / 7गोदरेज प्रॉपर्टीजचे मुंबईसह देशातील इतर महानगरांमध्ये प्रकल्प आहेत. दरम्यान, गोदरेज कुटुंबाच्या मालकीच्या ३,४०० एकर जमिनीत अनेक राखीव जागा असल्याचेही बोलले जाते.7 / 7जर आपण या मर्यादेसह या जमिनीचे मूल्य ठरवले तर ते सुमारे ३०,००० कोटी असू शकते. जर आपण लँड बँकवर या मर्यादा सोडल्या तर त्याचे मूल्य ५०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. विक्रोळी हे मुंबईच्या मध्यवर्ती उपनगरीय भागात स्थित आहे.