शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:11 IST

1 / 8
Multibagger Stock: शेअर बाजारात योग्य वेळी योग्य स्टॉक निवडला, तर गुंतवणूकदारांचे चांदी होऊ शकते. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं तसं जोखमीचं मानलं जातं, परंतु परतावा देण्याच्या बाबतीत ते अशी कमाल करतात की सगळ्यांचे डोळे विस्फारले जातात. असाच मालामाल करणारा एक पेनी स्टॉक आहे इंटिग्रेटेड इंडस्ट्रीजचा.
2 / 8
डिसेंबर २०२० मध्ये हा शेअर केवळ ₹०.५० च्या आसपास ट्रेड करत होता, तर आता तो बीएसईवर ₹२९.८० च्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत स्टॉकनं सुमारे ५९,५००% ची स्फोटक वाढ दर्शविली आहे. सोमवारीही या शेअरला अपर सर्किट लागलं.
3 / 8
उत्कृष्ट परतावा असूनही हा शेअर पूर्णपणे सरळ वर गेला नाही, तर यात चढ-उतारही मोठ्या प्रमाणात दिसून आले. मागील एका वर्षात स्टॉक सुमारे १८% नी घसरला, तर गेल्या सहा महिन्यांत तो पुन्हा सुमारे १९% नी वाढला आहे. अल्प-मुदतीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, मागील पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरने सुमारे १९% आणि एका महिन्यात सुमारे २४% चा मजबूत परतावा दिला आहे. साल २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरनं सुमारे २.२३% ची वाढ दर्शविली आहे, जी त्याचा मजबूत ट्रेंड दर्शवते.
4 / 8
गेल्या पाच वर्षांत या शेअरने अशी जबरदस्त झेप घेतली की यात पैसे लावणारे मालामाल झाले. पाच वर्षांपूर्वी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत केवळ पन्नास पैसे होती, जी आता ३० रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळेच पाच वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर शेअरमध्ये केलेली ₹१ लाख ची गुंतवणूक आज वाढून सुमारे ₹५.९६ कोटी झाली आहे.
5 / 8
कंपनीने १ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या शेअर स्प्लिट करुन ₹१० फेस व्हॅल्यू वरून ₹१ केली होती आणि यापूर्वी एप्रिलमध्ये १:१ बोनस शेअरची घोषणाही केली होती, ज्यामुळे दीर्घकाळच्या गुंतवणूकदारांना अतिरिक्त फायदा मिळाला.
6 / 8
३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा कन्सॉलिडेटेड निव्वळ नफा वार्षिक आधारावर १०८% नी उसळी घेऊन ₹२९.८८ कोटी वर पोहोचला, तर मागील वर्षी याच तिमाहीत तो ₹१४.४० कोटी होता. त्याच वेळी, ऑपरेशनल महसुलातही शानदार वाढ झाली आणि तो ५४% च्या उसळीसह ₹२८६.४६ कोटी पर्यंत पोहोचला.
7 / 8
कंपनीचा एकूण खर्च वाढला असला तरी, नफ्यातील वेगवान वाढ हे दर्शवते की व्यवसायाचे ग्रोथ मॉडेल मजबूत होत आहे. सहामाही आकडेवारीवर नजर टाकल्यास, H1 FY26 मध्ये कंपनीची निव्वळ विक्री ६४% च्या वाढीसह ₹५३६.७२ कोटी वर पोहोचली, तर निव्वळ नफा दुप्पट होऊन ₹५४.६६ कोटी झाला.
8 / 8
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा