Stock Market Investment Multibagger Share : शेअर बाजारात घसरण, तरीही 'या' शेअरनं पकडला रॉकेट स्पीड; १ लाखाचे झाले ७.८४ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:36 IST
1 / 6Multibagger Share : सध्या शेअर बाजारात (Stock Market) अनिश्चिततेचं वातावरण आहे. परंतु असं असलं तरी काही छोट्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न्स दिले आहेत.2 / 6टाइन अॅग्रो (Tine Agro) या कंपनीचा शेअरही यापैकीच एक आहे. या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न दिले आहेत. वर्ष दर वर्ष प्रमाणे हा मल्टीबॅगर स्टॉक 7.14 रुपयांवरून वाढून 56.05 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. या दरम्यान, या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना 685.01 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.3 / 6सध्या शेअर बाजारात अनेक शेअर्स गडगडत असताना या मल्टीबॅगर टेक्सटाईल स्टॉकनं (Multibagger textile stock) आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. टाइन अॅग्रोचे शेअर बीएसईवर 56.05 रुपयांच्या ऑल टाईम हाय लेव्हलवर पोहोचले आहेत.4 / 6गेल्या आठवड्याभरात या स्टॉकला सर्व पाच ट्रेड सेशन्समध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 21.50 टक्के रिटर्न मिळाले आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत हा शेअर 22.65 रुपयांवरून वाढून 56.05 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे.5 / 6या दरम्यान हा शेअर 150 टक्के वाढला आहे. याचा सध्याचा ट्रेड व्हॉल्यूम 6,53,631 आहे, जो 20 दिवसांच्या एव्हरेज व्हॉल्युमच्या 51,324 पेक्षा अधिक आहे. या मल्टीबॅगर टेक्सटाईल स्टॉकचे सध्याचे बाजार भांडवल 31 कोटी आहे.6 / 6जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी 3 जानेवारी 2022 रोजी 1 लाख रुपये प्रति शेअर 7.14 या दराने Tine Agro शेअरच्या किमतीत गुंतवले असते, तर आज ही रक्कम 7.85 लाख रुपये झाली असती. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्यापूर्वी 22.65 रुपये दराने एक लाख गुंतवले असते, तर आज ही रक्कम 2.48 लाख रुपये झाली असती.