1 / 7Multibagger Share : शेअर बाजारात जर तुम्ही तुमची गुंतवणूक दीर्घ काळासाठी ठेवली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होते. एका अशाच शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. १० वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न देत, कोट्यधीश बनवलं आहे.2 / 7या कंपनीचं नाव जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas Share Price) असं आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. या दरम्यान या शेअरची किंमत १.७७ रुपयांवरून ५४७.९० रुपयांवर पोहोचला आहे.3 / 7१३ एप्रिल २०१२ रोजी बीएसईवर GRM ओव्हरसीजचे शेअर्स १.७७ रुपयांच्या पातळीवर होते. शुक्रवारी २९ एप्रिल २०२२ रोजी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात हे शेअर ५४७.९० रुपयांवर पोहोचले. 4 / 7त्याच वेळी, गेल्या पाच वर्षात या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न दिले आहे. गेल्या पाच वर्षांत हा शेअर (BSE ५ मे २०१७ रोजी बंद किंमत) ६ रुपयांवरून ५४७.९० रुपयांपर्यंत वाढला आहे.GRM ओव्हरसीजच्या शेअर्सनं गेल्या एका वर्षात २४७.६१ टक्क्यांचे रिटर्न्स दिले आहेत.5 / 7एक वर्षापूर्वी, ३ मे २०२१ रोजी हे शेअर्स १४६.२६ रुपये प्रति शेअर या पातळीवर होते. गेल्या सहा महिन्यांत हे शेअर्स २२२.९९ रुपयांवरून ५४७.९० रुपयांपर्यंत वाढले. या कालावधीत या शेअरनं १४५.७१ टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. मात्र, या वर्षात स्टॉकने आतापर्यंत शून्य रिटर्न्स दिले.6 / 7GRM ओव्हरसीजच्या शेअर प्राईज हिस्ट्री पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दहा वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १.७७ रुपयांच्या पातळीवर गुंतवणूक केली असती, तर आज ही रक्कम ३ कोटींहून अधिक झाली असती. 7 / 7त्याच वेळी, पाच वर्षांपूर्ण एखाद्यानं यात गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती तर त्या १ लाख रुपयांचं मूल्य आज ९१.३१ लाख रुपये झालं असतं. गेल्या वर्षीच्या शेअरच्या किमतीनुसार १ लाख रुपयांचं मूल्य आज ३.७४ लाख रुपये झालं असतं.