१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
By जयदीप दाभोळकर | Updated: April 28, 2025 09:37 IST
1 / 61 May Rule Change: मे महिनाही प्रत्येकासाठी खास ठरणार आहे, वास्तवात या महिन्यात अनेक बदल होणार आहेत ज्यांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होईल. रेल्वे तिकीट बुकिंगपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या चार्जपर्यंत १ मे रोजी अनेक मोठे बदल होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया की १ मे पासून काय बदल होऊ शकतात.2 / 6रिझर्व बँकेचा नवीन नियम १ मे २०२५ पासून लागू होणार आहे. यानुसार, जर तुम्ही एटीएमद्वारे कॅश काढत, जमा करत किंवा बॅलन्स चेक करत असाल तर हे नवे नियम तुम्हाला नक्की माहित असावे लागतील. प्रत्यक्षात १ मे पासून फ्री लिमिट ओलांडल्यास प्रत्येक एटीएम व्यवहारावर अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकतं. कॅश काढण्यासाठी शुल्क १७ रुपयांवरून वाढून १९ रुपये प्रति व्यवहार होईल. बॅलन्स चेक करण्याचं शुल्क आता ६ रुपयांवरून वाढून ७ रुपये प्रति व्यवहार होईल.3 / 6१ मे २०२५ पासून ट्रेन तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. रेल्वेच्या नवीन नियमाचा प्रभाव तिकीट बुकिंग, भाडं, रिफंड प्रक्रिया इत्यादींवर पडणार आहे. १ मे पासून वाटिंग तिकीट स्लीपर किंवा एसी कोचमध्ये मान्य राहणार नाही. फक्त जनरल कोचमध्येच वाटिंग तिकीटवर प्रवास केला जाऊ शकतो. अॅडव्हान्स रिजर्वेशन कालावधी १२० दिवसांवरून कमी करून ६० दिवस केला गेला आहे. मेपासून रेल्वे तीन प्रमुख चार्जेसही वाढवू शकतो.4 / 6दर महिन्याच्या एका तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होतो. अशा परिस्थितीत या वेळी १ मे २०२५ रोजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी किंवा जास्त होऊ शकतात. सिलिंडरच्या किमतीत बदलामुळे सामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.5 / 6१ मे २०२५ पासून एफडी आणि बचत खात्यांमध्ये काही महत्वाचे बदल होऊ शकतात. या बदलांमध्ये व्याजदरांचा समावेश देखील होऊ शकतो. आरबीआयच्या निर्देशानुसार सध्या एटीएममधून पैसे काढताना शुल्क वाढण्याची शक्यता आहे, तथापि एफडी आणि बचत खात्यांच्या व्याज दरांबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 6 / 6१ मे २०२५ पासून देशातील ११ राज्यांमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणाची योजना 'एक राज्य, एक आरआरबी' अंतर्गत लागू केली जाऊ शकते. ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणं आणि खर्च कमी करणे हे त्याचं उद्दीष्ट आहे. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान या ११ राज्यांचा समावेश आहे. (टीप: हे वृत्त सामान्य माहितीवर आधारित आहे.)