शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 10:58 IST

1 / 6
सध्या जगावर मंदीचं सावट असून दिग्गज टेक कंपन्याही या फेऱ्यात अडकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अ‍ॅपल, सॅमसंग आणि गुगलसारख्या टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे.
2 / 6
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनी लवकरच आपल्या ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.
3 / 6
मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. ही अमेरिका (युनायटेड स्टेट्स) स्थित कंपनी आहे. याची सुरुवात १९७५ मध्ये झाली. बऱ्याचदा अनेक मोठ्या कंपन्या विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतात.
4 / 6
मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ च्या सुरुवातीला कंपनीने सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आता २०२५ मध्ये कंपनीने ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
5 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जून २०२४ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे २,२८,००० कर्मचारी काम करत होते. यापैकी ३ टक्के म्हणजे अंदाजे ६,८००. याचा अर्थ कंपनीने ६८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो.
6 / 6
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या संस्थेला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की आम्हाला कंपनीची रचना आणि रणनीती सोपी करायची आहे. जेणेकरून कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
टॅग्स :microsoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडोBill Gatesबिल गेटसjobनोकरीgoogleगुगल