शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसला Lakhpati Didi Yojana चा देखावा; काय आहे या योजनेत खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:06 IST

1 / 6
Lakhpati Didi Yojana : रविवारी भारतानं आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यानिमित्ताने दिल्लीतील कार्तव्य पथावर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं होते. या परेडमध्ये विविध प्रकारचे देखावेही दिसले, ज्यात पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील सर्व योजनांचे देखाव्यांचाही समावेश होता.
2 / 6
यातील एक देखावा हा लखपती दीदी योजनेचाही होता. लखपती दीदी योजना मोदी सरकारनं २०२३ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल आणि काय आहे या योजनेत खास.
3 / 6
लखपती दीदी योजना १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू करण्यात आली होती. ही योजना महिला सक्षमीकरणाचं प्रतीक आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे सव्वा कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत.
4 / 6
या योजनेअंतर्गत महिलांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. ही योजना देखील एक प्रकारचा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. कारण या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी तयार केलं जातं.
5 / 6
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित केलं जाते. त्याचबरोबर आर्थिक मदतीसाठी १ ते ५ लाखांपर्यंतचं बिन व्याजी कर्जही देण्यात येतं.
6 / 6
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून लखपती दीदी योजनेच्या देखाव्यात हातात पैसे असलेल्या महिलेचा पुतळा दाखवण्यात आला. यासोबतच क्यूआर कोडही दाखवण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे महिला उद्योजकांची भूमिका दर्शविणारा देखावा उभारण्यात आला होता.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकGovernmentसरकार