By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 16:10 IST
1 / 8आज अंबानी यांचं नाव माहित नसेल असं कोणीही नसेल. अंबानी कुटुंबातील सदस्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आम्ही आपण अंबानी कुटुंबातील सून कृशा शाह हीच्याबद्दल जाणून घेणार आहोत.2 / 8मुकेश अंबानी यांचा धाकटे बंधू अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी यांनी 20 फेब्रुवारी 2022 रोजी कृशा शाह यांच्याशी विवाह केला. अनमोल अंबानी अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. 3 / 8अनमोल अंबानी यांच्याकडे सध्या रिलायन्स कॅपिटलची जबाबदारी आहे. त्याच वेळी, कृशा शाह एक व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कृशा शाह यांच्याबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. परंतु कृशा शाह नेटवर्थच्या बाबतीत कोणाच्याही मागे नाहीत. त्यांची नेटवर्थ कोटींमध्ये आहे आणि त्या एक यशस्वी उद्योजकही आहेत.4 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार कृशा शाह यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे. त्या आपल्या भावासोबत कृशा डायस्को नावाची कंपनी चालवतात. त्या या कंपनीच्या सह-संस्थापक देखील आहेत. यापूर्वी त्यांनी युनायटेड किंगडममधील दिगग्ज आयटी कंपनी ॲक्सेंचरमध्ये काम केले.5 / 8त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून राजकीय अर्थशास्त्रासह पदवी प्राप्त केली आहे. नंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले. कृशा यांचे वडील निकुंज समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. कृशा यांची आई नीलम शाह एक फॅशन डिझायनर आहे.6 / 8कृशा यांची मोठी बहीण फॅशन ब्लॉगर आहे. कृशा यांची आई नीलम शाह यांनी मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून फॅशनमध्ये पदवी प्राप्त केली. लग्नापूर्वी त्यांनी एका निर्यात कंपनीसाठी डिझाइनर म्हणून काम केले.7 / 8मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार कृशा शाह या कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालक आहेत. मीडिया रिपोर्ट्स आणि कृशा शाह यांच्या इंटरनेटवरील माहितीनुसार नेटवर्थ 4 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. 8 / 8तथापि, त्यांच्या नेटवर्थबद्दल कोणतीही योग्य माहिती उपलब्ध नाही. कृशा शाह एक यशस्वी व्यावसायिक महिला आहेत. त्यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय यशस्वीरित्या पुढेही नेलाय. अनमोल अंबानी यांच्याशी लग्नानंतर कृशा शाह चर्चेत आल्या.