शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले? १० दिवसांत परत मिळवा; पाहा, सोप्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 7:57 PM

1 / 11
गतवर्षीपासून कोरोनाचे संकट देशासह जागतिक पातळीवर घोंघावत आहे. गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. या दरम्यान डिजिटल व्यवहारचे प्रमाणही वाढले. मात्र, यासह फसवणूकही आली. (RBI Alert for Bank Fraud)
2 / 11
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. अगदी चहापासून खान-पान, शॉपिंग आणि अन्य खरेदी करण्यापर्यंत सर्व व्यवहार ऑनलाइन होत आहेत. डिजिटल व्यवहार होत असताना याच काळात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. (Reserve Bank of India)
3 / 11
यूपीआय पेमेंट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट, ऑनलाईन बँकिंग किंवा मोबाईल ​बँकिंग अशा अनेक माध्यमातून व्यवहार होत असताना ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने काही उपाययोजना केल्या असून, त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
4 / 11
ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल फ्रॉड किंवा सायबर फ्रॉडमध्ये हॅकर्स संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती हॅक करत बँक खात्यातून पैसे गायब करतात. अशा परिस्थितीत ग्राहकाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते.
5 / 11
अचानक खात्यातून गायब झालेले पैसे परत कसे मिळवावे, याबाबत अनेकांना माहिती नसते. RBI ने अशा प्रकरणांमध्ये पैसे परत मिळवण्याबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत. (tips for how to get back your money cheated in online fraud transaction)
6 / 11
कोणत्याही ग्राहकाची अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ याची माहिती संबंधित बँकांना देण्यास RBI ने सांगितले आहे. यामुळे ग्राहकाचे होणारे नुकसान टळू शकते, असे सांगितले जाते.
7 / 11
जर ऑनलाईन व्यवहारात तुमची फसवणूक झाली, तर त्याबाबत तात्काळ बँकेला कळवा. त्यामुळे तुमचं नुकसान कमी होईल किंवा काहीच नुकसान होणार नाही, असे RBI म्हणते.
8 / 11
बँका ग्राहकांच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी आता विमा कंपन्यांकडून पॉलिसी काढतात. अशा फसवणुकीच्या संकटाची शक्यता गृहीत धरून काही बँका पॉलिसी काढतात. ग्राहकाने फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर संबंधित बँका याची माहिती विमा कंपन्यांना देतात. विमा कंपन्या बँकेच्या पॉलिसीनुसार नुकसान भरपाई करतात.
9 / 11
बँक आपल्या खात्यांवरील पैशांच्या सुरक्षेसाठी विमा काढते, तसाच विमा तुम्हीही व्यक्तिगत पातळीवर काढू शकता. बजाज अलायन्स आणि HDFC अर्गो यांसारख्या विमा कंपन्या अशा प्रकारचा विमा पुरवतात.
10 / 11
एखाद्या ग्राहकाची ऑनलाइन व्यवहारात फसवणूक झाली तर त्याबाबत तीन दिवसांत बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. असे केल्यास ग्राहकाचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, असे म्हटले जाते. अशा स्थितीत आरबीआयने बँकांना १० दिवसांत ग्राहकांचे फसवणूक झालेले पैसे देण्याचे निर्देश दिले आहेत.
11 / 11
ग्राहकांनी बँकेतील पैसे चोरीला केल्याची तक्रार ४ ते ७ दिवसांनंतर दिली, तर संबंधित ग्राहकांना २५ हजार रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागू शकते, असे RBI कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकfraudधोकेबाजीonlineऑनलाइन