KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 20:07 IST
1 / 12KGF Gold Mine : तुम्ही KGF हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात सोन्याची खाण दाखवली आहे. जे चित्रपटात दाखवले आहे ते खरेच आहे हे तुम्हाला सांगितले तर पटणार नाही. पण अशी भारतात एक खाण होती, त्या खाणीचे नाव 'कोलार गोल्ड फिड्स' असे या खाणीचे नाव आहे. 2 / 12ही खाण किती वर्षे सुरू होती, या खाणीतून आतापर्यंत किती सोने काढले आहे, याबाबत अनेकांना माहिती नाही. 3 / 12कोलार गोल्ड फिल्ड (KGF) येथून १२० वर्षे सतत उत्खनन केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, या खाणीतून ८०० ते ९०० टन सोने काढण्यात आले. भारताच्या सोन्याच्या वापराच्या दृष्टीने हा आकडा खूप मोठा आहे.4 / 12जगातील सर्वात जास्त सोन्याचे साठे अमेरिकेकडे आहेत. त्यांच्याकडे सुमारे ८,१३३ टन सोने आहे. तर एकट्या केजीएफमधून त्याहूनही जास्त सोने काढण्यात आले आहे.5 / 12केजीएफ खाणीतून १८८० च्या दशकात ब्रिटिश काळात सोने काढण्यास सुरुवात झाली. 6 / 12या खाणी बराच काळ चालू राहिल्या, पण हळूहळू सोने सापडण्याचे कमी झाले. खाणकामाचा खर्च वाढत गेला आणि सोन्याचे प्रमाण कमी होत गेले. अखेर २००१ मध्ये सरकारने केजीएफ ही खाण पूर्णपणे बंद केली.7 / 12२००१ पासून या खाणीतून सोने काढणे बंद झाले. खाण पुन्हा सुरू करण्याबाबत वेळोवेळी चर्चा झाल्या असल्या तरी ही खाण अजूनही बंदच आहे.8 / 12केजीएफला एकेकाळी आशियातील सर्वात मोठी सोन्याची खाण म्हटले जात होते. या खाणीत ब्रिटीश अधिकारी राहत होते आणि ही वसाहत इंग्रजी धर्तीवर बांधली म्हणून तिला 'लिटिल इंग्लंड' असेही म्हटले जायचे.9 / 12एकेकाळी केजीएफची गणना केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध सोन्याच्या खाणींमध्ये केली जात होती. केजीएफ ही भारतातील सर्वात खोल सोन्याची खाण आहे, ही खाण कर्नाटकात आहे. 10 / 12ही खाण नेहमी चर्चेत राहिली. कामगारांच्या शोषणासाठी आणि कामाच्या खराब परिस्थितीसाठी ब्रिटिश राजवटीवर जोरदार टीका झाली.11 / 12खाण बंद झाल्यानंतर, हजारो कुटुंबे बेरोजगार झाली, यामुळे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. पर्यावरणाचे नुकसान आणि जमीन खचण्याच्या घटनांमुळे देखील केजीएफची चर्चा झाली.12 / 12आता पुन्हा एकदा ही खाण पुन्हा सुरू करण्याची मागणी सुरू आहे. पण, खर्च आणि तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नाही असे सरकारचे मत आहे.