केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 09:05 IST
1 / 8आजकाल पालक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करण्याचा विचार करतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी एक मजबूत आर्थिक पाया तयार करायचा असेल, तर तुम्ही वयाच्या ५ व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करू शकता. 2 / 8चक्रवाढीची ताकद इतकी मोठी आहे की ५ लाख रुपयांची छोटी गुंतवणूक देखील दीर्घकाळात अनेक कोटींमध्ये बदलू शकते. यामुळे मुलांला केवळ आर्थिक स्वातंत्र्य मिळणार नाही तर भविष्यातील शिक्षण, करिअर आणि लग्न यासारखे मोठे खर्च देखील सहजपणे पूर्ण करता येतील.3 / 8खेळणी किंवा गॅझेट्स सारख्या सामान्य वाढदिवसाच्या भेटवस्तू मुलांना अल्पकालीन आनंद देऊ शकतात, परंतु आर्थिक गुंतवणूक आयुष्य सुरक्षित आणि दीर्घकाळात पैसे कमावणारी बनवू शकते. ५ वर्षांच्या मुलांना आज त्याचं महत्त्व समजणार नाही, परंतु जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा ही गुंतवणूक त्यांच्या करिअर, शिक्षण आणि भविष्यातील गरजांसाठी खूप उपयुक्त ठरेल.4 / 8या आर्थिक गिफ्टची सर्वात मोठी शक्ती म्हणजे चक्रवाढ, जितका जास्त काळ पैसा गुंतवला जाईल तितका तो वाढतो, केवळ सामान्य दरानंच नाही तर वेगानं. उदाहरणार्थ, जर ₹५ लाख वार्षिक १२% परताव्यानं गुंतवले तर ३५ वर्षांत ही रक्कम सुमारे ₹२.६ कोटीपर्यंत वाढू शकते. खरं तर, मुलाच्या सक्रिय सहभागाशिवाय, ती सुरुवातीच्या रकमेच्या ५० पट जास्त आहे.5 / 8जर आपण गणित पाहिलं तर अंदाजे १२ टक्के व्याजदरानुसार एका वर्षाच्या अखेरिस ही रक्कम ५.६ लाख रुपये, १० वर्षानंतर १५.५ लाख रुपये, २० वर्षानंतर ४८ लाख रुपये, ३० वर्षानंतर १.५ कोटी रुपये आणि ३५ वर्षानंतर ही रक्कम २.६४ कोटी रुपये होऊ शकते. जर दीर्घकालीन कालावधीत समान वार्षिक परतावा १३% असेल - जो इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इतर बाजार-संबंधित पर्यायांमधून मिळवता येतो, तर ५ लाख रुपयांचं मूल्य अंदाजे ३.६ कोटी रुपयांमध्ये बदलू शकतं. म्हणजेच, तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितकी गुंतवणूक कमी आणि रक्कम अधिक मिळेल.6 / 8या प्रकारचा निधी हा केवळ पैसे कमविण्याचा पर्याय नाही तर भविष्य सुरक्षित करण्याचा एक मार्ग देखील आहे. जेव्हा तुमचं मूल मोठं होईल तेव्हा ते घर खरेदी करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा लवकर निवृत्ती घेण्यासाठी याचा वापर करू शकतं. दरम्यान, यामध्ये योग्य गुंतवणूक पर्याय निवडणं देखील महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दीर्घकालीन बाजार जोखमीसाठी तयार असाल, तर म्युच्युअल फंड किंवा काही युलिप पर्याय योग्य असू शकतात.7 / 8चक्रवाढ ही काही वर्षांसाठी नाही तर दशकांसाठी सोडली तर उत्तम काम करते. खरं तर, सुरुवातीच्या काळात लहान गुंतवणूक देखील भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करण्याचा पाया रचते. वयाच्या २० व्या वर्षी ५ लाख रुपये गुंतवले तर ४० वर्षांत तेवढा निधी जमणार नाही जितका वयाच्या ५ व्या वर्षी गुंतवला तर निर्माण होऊ शकतो. 8 / 8(टीप: हा लेख फक्त माहितीसाठी आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)