हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:57 IST
1 / 9सध्या एआयची मोठी चर्चा सुरू आहे. एआयमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत, आयटी क्षेत्रात एआयचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचारी कमी केल्याचे समोर आले आहे.2 / 9हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. एआयमुळे इतर अनेक क्षेत्रांमध्ये अजूनही नोकऱ्या जाऊ शकतात आणि अनेक नोकऱ्या धोक्यात आहेत. तर काही क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे. या नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्यांना वाढीव पगार देखील मिळू शकतो. 3 / 9एआयच्या काळात काही क्षेत्रांमध्ये भविष्य अजूनही दिसत आहे. जर तुम्ही सध्या या क्षेत्रांमध्ये काम करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही सध्या शिक्षण घेत असाल तर त्यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम घेऊन तुम्ही या नोकऱ्यांमध्ये करिअर करू शकता.4 / 9येणाऱ्या काळात एआय सेक्टमध्ये मोठी संधी निर्णाण होणार आहे. यामध्ये काही पद आहेत. ती जाणून घेऊया. मशीन लर्निंग इंजीनियर (Machine learning engineer), एआई सेफ्टी स्पेशलिस्ट (AI safety specialist), डेटा स्ट्रेटिजिस्ट (data strategist), प्रॉम्प्ट इंजीनियर (Prompt engineer), एआई प्रोडक्ट एनालिस्ट (AI product analyst) यामध्ये संधी तयार होऊ शकते.5 / 9एआयच्या वाढत्या प्रभावामुळे अक्षय ऊर्जा क्षेत्रावर कमीत कमी परिणाम होईल आणि एआयच्या युगातही तेथील नोकऱ्या सुरक्षित मानल्या जात आहेत, असे अनेक अहवालातून समोर आले आहे.6 / 9सोलर प्रोजेक्ट इंजीनियर (Solar project engineer), एनर्जी स्टोरेज स्पेशलिस्ट (Energy storage specialist), रिनेवबेल इंजीनियर (Renewable O&M engineer), ग्रिड डिजिटलाइजेशन एनालिस्ट (Grid digitalisation analyst)7 / 9एआयचा पर्यावरण आणि संबंधित क्षेत्रांवर कमी परिणाम होण्याची शक्यता आहे. टेलिमेडिसिन ऑपरेशन्स विशेषज्ञ , आरोग्य डेटा विश्लेषक, क्लिनिकल रिसर्च असोसिएट, वैद्यकीय तंत्रज्ञान अभियंता, बायोटेकस संबंधीत नोकऱ्या, या नोकऱ्यांची मागणी वाढू शकते.8 / 9इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात, बॅटरी डिझाइन अभियंते, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली तज्ञ, ईव्ही अभियंते, ईव्ही डायग्नोस्टिक अभियंते आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनर्स यासारख्या व्यावसायिकांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या या पदांवर असलेल्यांनाही चांगला पगार वाढू शकतो.9 / 9भविष्यात सेमीकंडक्टर क्षेत्रात देखील वाढ होऊ शकते. या क्षेत्रात लोकांची आवश्यकता असेल. यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढू शकतात. चिप डिझाइन अभियंता, व्हेरिफिकेशन इंजिनिअर , भौतिक डिझाइन तज्ञ , सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन तंत्रज्ञ, पॅकेजिंग आणि चाचणी अभियंता या क्षेत्रामध्ये संधी तयार होऊ शकतात.