शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 13:01 IST

1 / 7
गुजरातमधील जैन समाजाने एकाचवेळी तब्बल १८६ लक्झरी कार खरेदी करून त्यांच्या आर्थिक ताकदीचे प्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण डीलमध्ये जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने थेट कार उत्पादकांशी संपर्क साधून २१ कोटी रुपयांची विक्रमी सूट मिळवली आहे.
2 / 7
संघटनेचे उपाध्यक्ष हिमांशु शाह यांनी या 'अद्वितीय करारा'बद्दल माहिती दिली. जेआयटीओ ही ६५,००० सदस्य असलेली एक ना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. या १८६ लक्झरी कार्समध्ये बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडीज सारख्या महागड्या ब्रँड्सचा समावेश आहे.
3 / 7
प्रत्येक कारची किंमत ६० लाख रुपये ते १.३ कोटी रुपयांच्या दरम्यान होती. संघटनेच्या देशभरातील या अभियानामुळे त्यांच्या सदस्यांची एकूण २१ कोटी रुपयांची बचत झाली. सरासरी प्रत्येक सदस्याला ८ लाख ते १७ लाख रुपयांपर्यंत सूट मिळाली, जी एका कुटुंबासाठी दुसरी कार घेण्यासाठी पुरेशी आहे.
4 / 7
हिमांशु शाह यांनी स्पष्ट केले की, यापैकी बहुतांश कार गुजरातच्या जैन समुदायाच्या लोकांनी खरेदी केल्या आहेत. संघटनेने केवळ सुविधा पुरवठादार म्हणून काम केले असून यातून त्यांना कोणताही आर्थिक लाभ झाला नाही. या अभिनव उपक्रमाचे सूत्रधार नितीन जैन यांनी सांगितले की, काही सदस्यांनी समुदायाच्या खरेदी क्षमतेचा फायदा घेत मोठी सूट मिळवण्याची कल्पना मांडली.
5 / 7
जैन समुदायाची मजबूत क्रयशक्ती हे एक वैशिष्ट्य असल्यामुळे, आम्ही थेट लक्झरी कार उत्पादकांशी संपर्क साधला. कार उत्पादकांनीही या डिलला सकारात्मक प्रतिसाद दिला, कारण इतक्या मोठ्या ऑर्डरमुळे त्यांची मार्केटिंग आणि जाहिरातीवर होणारा खर्च कमी झाला, ज्यामुळे त्यांनाही फायदा झाला.
6 / 7
लक्झरी कारच्या या यशस्वी व्यवहारानंतर उत्साहित झालेल्या JITO ने आता आपली व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमांशु शाह यांनी सांगितले की, JITO ने 'उत्सव' नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.
7 / 7
या उपक्रमांतर्गत, आता दागिने, टिकाऊ ग्राहक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रमुख ब्रँड्ससोबतही अशीच सवलतीची व्यवस्था केली जात आहे. याचा अर्थ, भविष्यात जैन समाजातील सदस्यांना या वस्तूंवरही मोठी बचत होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :businessव्यवसायGujaratगुजरातcarकारMONEYपैसा