४००० कोटी रुपयांचा पाण्यात 'तरंगणारा महाल'; अब्जाधीश उडवणार लग्नाचा बार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 15:24 IST
1 / 10नुकताच क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि युट्यूबर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. चहने पोटगी स्वरुपात धनश्रीला ५ कोटी रुपये दिले आहेत. 2 / 10ही बातमी चर्चेत असतानाच जगातील सर्वात महागडा घटस्फोट देणारे अॅमेझॉनचे संस्थापक आणि दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण, ते लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. 3 / 10बेझोस या वर्षाच्या अखेरीस त्यांची मैत्रिण आणि उद्योजक लॉरेन सांचेझसोबत लग्न करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हाय-प्रोफाइल लग्नासाठी इटली येथील प्रसिद्ध कोरू (Koru) जहाजाची व्यवस्था करण्यात आली आहे. याची किंमत जवळपास ४००० कोटी रुपये इतकी आहे. याला पाण्यावर तरंगणारा महालही म्हणतात.4 / 10टेक अब्जाधीश जेफ बेझोस यांनी २५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये मॅकेन्झी स्कॉटसोबत काडीमोड घेतला. सांचेझचाही घटस्फोट झाला आहे. जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांचे लग्न बेझोस यांच्या लक्झरी सुपरयाट “कोरू” वर होणार आहे. बेझोस (६१) आणि सांचेझ (५५) यांचा मे २०२३ मध्ये एंगेजमेंट झाली आहे.5 / 10पेज सिक्सच्या वृत्तानुसार, बेझोस आणि सांचेझ यांच्या लग्नासाठी “कोरू” इटलीच्या किनारपट्टीवर नांगर टाकणार आहे. लग्नाची तारीख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कोरू ही एक आलिशान आणि आधुनिक जहाज आहे, ज्याला पाण्यावर तरंगणारा महाल देखील म्हणतात.6 / 10हे जहाज २०२३ मध्ये नेदरलँड्स शिपयार्ड कंपनी Oceanco ने बांधले होते. ही जगातील सर्वात मोठी सेलिंग यॉट्स आहे. कोरू हे नाव माओरी भाषेतून घेतले असून ज्याचा अर्थ नवीन सुरुवात आहे.7 / 10कोरू जहाजाची लांबी १२७ मीटर (सुमारे ४१७ फूट) आहे. यात तीन प्रचंड मास्ट आहेत, ज्यांची उंची ७० मीटरपेक्षा जास्त आहे. त्याची बाह्य रचना लाकूड आणि स्टील वापरून क्लासिक आणि आधुनिक शैलींचे मिश्रण आहे.8 / 10कोरूची अंदाजे किंमत ५०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४,००० कोटी रुपये) आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात महागड्या नौकांपैकी एक आहे. कोरूच्या देखभाल आणि ऑपरेशनवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.9 / 10जेफ बेझोसची सुपरयाट कोरू लक्झरी सुविधांनी सुसज्ज आहे. कोरूमध्ये अनेक डेक आहेत, ज्यामध्ये सन डेक, डायनिंग एरिया आणि लाउंजचा समावेश आहे. त्यात एक मोठा स्विमिंग पूल देखील आहे.10 / 10जेफ बेझोसची सुपरयाट कोरू लक्झरी सुविधांनी सुसज्ज आहे. कोरूमध्ये अनेक डेक आहेत, ज्यामध्ये सन डेक, डायनिंग एरिया आणि लाउंजचा समावेश आहे. त्यात एक मोठा स्विमिंग पूल देखील आहे.