शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:58 IST

1 / 7
शेअर बाजारातील जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड (जेपी पॉवर)च्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी दिसून आली. सोमवारी जेपी पॉवरचा शेअर ९ टक्क्यांहून अधिक वधारला आणि १७.७४ रुपयांवर बंद झाला. एका महिन्यात कंपनीचे शेअर्स ३३ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.
2 / 7
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स किंवा जेपी पॉवरचा शेअर ९९ टक्क्यांहूनही अधिक घसरून ६० पैशांवर पोहोचले होते. या पातळीपासून, कंपनीच्या शेअर्समध्ये २८५७ टक्क्यांची जोरदार वाढ दिसून आली आहे.
3 / 7
...आता शेअरमध्ये जबरदस्त तेजी - जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडचा ​​शेअर २८ डिसेंबर २००७ रोजी १३५.८५ रुपयांवर होता. या पातळीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. २७ मार्च २०२० रोजी जेपी पॉवरचा शेअर ६० पैशांवर घसरला. कंपनीच्या शेअरमध्ये ६० पैशांच्या पातळीपासून काही प्रमाणात वाढ झाली आहे.
4 / 7
जेपी पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २३.७७ रुपये, तर नीचांकी पातळी १२.३५ रुपये एवढी आहे.
5 / 7
९ जून २०२५ रोजी जेपी पॉवरचे शेअर्स १७.७४ रुपयांवर बंद झाला होता. गेल्या ५ वर्षांपेक्षा काही अधिक काळापासून जेपी पॉवरच्या शेअर्समध्ये २८५७ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
6 / 7
5 वर्षांत 1176% चा परतावा - जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षात ११७६ टक्क्यांची वाढ झाली आहे. १२ जून २०२० रोजी कंपनीचा शेअर १.३९ रुपयांवर होते. ९ जून २०२५ रोजी जेपी पॉवरचा शेअर १७.७४ रुपयांवर बंद झाले. एका वर्षात कंपनीचा शेअर जवळजवळ स्थिर राहिले आहेत. सहा महिन्यांत कंपनीचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक