15 दिवसांत आली 275% ची तुफान तेजी, आता जबरदस्त आपटला शेअर; IPO मध्ये 32 रुपये होती किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 20:51 IST
1 / 9शेअर बाजारात 15 दिवसांत मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा (IREDA) शेअर जबरदस्त आपटला आहे. या सरकारी कंपनीचा शेअर शुक्रवारी 10 टक्क्यांच्या घसरणीसह 108.19 रुपयांवर बंद झाला. 2 / 9प्रॉफिट बुकिंगमुळे शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे. मिनी रत्न कंपनी IREDA चा IPO गेल्या महिन्यात 21 नोव्हेंबर रोजी खुला झाला होता आणि याची किंमत 30-32 रुपये एवढी होती. कंपनीचा शेअर 14 डिसेंबर 2023 रोजी 123.37 रुपयांवर पोहोचला होता. हा कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.3 / 9इश्यू प्राइसपेक्षा 275% ने वधारला शेअर - सरकारी कंपनी इरेडाचा आयपीओ 21 नोव्हेंबरला खुला झाला होता 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत ओपन होता. कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड 30-32 रुपये एवढा होता. कंपनीचा शेअर 32 रुपये दराने अॅलॉट झाला होता. 4 / 9मिनी रत्न कंपनी इरेडाचा शेअर 29 नोव्हेंबर रोजी 50 रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगपासून कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. 14 डिसेंबर 2023 रोजी IREDA चा शेअर 123.37 रुपयांवर पोहोचला. 5 / 9कंपनीच्या शेअरने इश्यू प्राइसपासून 275 टक्क्यांची उसळी घेतली आहे. यामुळे ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स मिळाले ते मालामाल झाले आहेत.6 / 9इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा आयपीओ टोटल 38.80 पट सब्सक्राइब झाला आहे. या सरकारी कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इनव्हेस्टर्सच्या कॅटेगिरीमध्ये 7.73 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. 7 / 9नॉन-इंस्टीट्यूशनल इनव्हेस्टर्स (NII) कोट्यात 24.16 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. तर क्वॉलीफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) कोट्यात 104.57 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये एंप्लॉयीजच्या कॅटेगिरीत 9.80 पट सब्सक्रिप्शन मिळाले. 8 / 9महत्वाचे म्हणजे, इरेडाच्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 14 लॉट साठी बोली लावू शकत होते. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 460 शेअर आहेत.9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)