शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:44 IST

1 / 7
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम केवळ जागतिक शेअर बाजारांवरच नाही, तर कच्च्या तेलाच्या किमतींवरही होत आहे. याचा सर्वाधिक फटका आधीच कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानला बसला आहे. तिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारताच्या तुलनेत दुपटीने वाढल्या आहेत.
2 / 7
इराण-इस्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान सरकारने रविवारी रात्री अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत.
3 / 7
पाकिस्तानच्या अर्थ विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हाय स्पीड डिझेल (HSD) च्या किमतीत प्रति लिटर ७.९५ पाकिस्तानी रुपये आणि पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर ४.८० पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
4 / 7
आज, १६ जून २०२५ पासून हे नवे दर लागू झाले आहेत. आता पाकिस्तानमध्ये हाय स्पीड डिझेल २६२.५९ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर (पूर्वी २५४.६४) झाले आहे, तर पेट्रोल २५८.४३ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर (पूर्वी २५३.६३) झाले आहे.
5 / 7
पाकिस्तान सरकारने सांगितले आहे की इंधनाच्या किमतीतील ही वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या समायोजनाचा (adjustment) भाग आहे. हे दर पुढील १५ दिवसांनी पुन्हा तपासले जातील.
6 / 7
सध्या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ७५ डॉलरच्या पुढे गेली आहे, तर WTI क्रूडची जुलैची फ्युचर्स किंमत देखील प्रति बॅरल ७३.९९ डॉलरच्या पुढे गेली आहे. या वाढत्या किमतींचा थेट परिणाम पाकिस्तानसारख्या आयातदार देशांवर होत आहे.
7 / 7
एकिकडे इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक तणाव वाढला आहे आणि दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानवर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे नवे संकट ओढवले आहे, ज्यामुळे सामान्य लोकांचे जीवन आणखी कठीण झाले आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानPetrolपेट्रोलDieselडिझेलIranइराणIsraelइस्रायल