शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुंतवणूकदारांची लागली लॉट्री! एकाच दिवसात ₹2000 ने वधारला हा शेअर, आता कंपनी देणार ₹205 चा डिव्हिडेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 21:49 IST

1 / 7
लार्ज कॅप कंपनी असलेल्या बॉश लिमिटेडने मंगळवारी आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर ₹205 चा अंतरिम डिव्हिडेंड देण्याची घोषणा केली आहे. यासाठी 23 फेब्रुवारी 2024 ही रेकॉर्ड डेटही निश्चित करण्यात आली आहे. बॉश लिमिटेडचा शेअर आज बीएसईवर 8% अर्थात 1,969.85 रुपयांनी वधारून ₹27265 वर पोहोचला आहे.
2 / 7
हे शेअर सोमवारी 25295.15 रुपयांवर बंद झाला होता. आज मंगळवारी हा शेअर 52 आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून या शेअरमध्ये 20.36% ची वाढ झाली आहे. तसेच गेल्या एका वर्षात यात 55.06% ची वाढ झाली आहे.
3 / 7
कंपनीने एका रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे की, 'आपल्या बोर्ड मेंबर्सनी आज आज झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर ₹205 च्या अंतरिम डिविडेंडची घोषणा केली आहे. यासाठी शुक्रवार, 23 फेब्रुवारी, 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. हा डिव्हिडेंड 6 मार्च, 2024 ला अथवा त्यानंतर दिला जाईल.”
4 / 7
या डिविडेंडची घोषणा करताना कंपनीने आपल्या तिसऱ्या तिमाहीचे निकालही घोषित केले आहेत. यात करानंतरचा एकत्रित निव्वळ नफा (PAT) 62.46% ने वाढून ₹518 कोटी झाला आहे. एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत तो ₹318.9 कोटी एवढा होता.
5 / 7
रेव्हेन्यूमध्येही 15% वाढ - बॉशचा रेव्हेन्यू 15% ने वाढून ₹4,205.2 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत तो ₹3,659.9 कोटी एवढा होते.
6 / 7
व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी अथवा EBITDA च्या पूर्वीची कमाई 43% ने वाढून ₹578.4 कोटी झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ₹403.7 कोटी एवढी होती. मार्जिनचा विचार करता ते वार्षिक 11% च्या तुलनेत 13.8% राहिले.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक