शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

..तर वयाच्या ४०व्या वर्षी कोट्याधीश व्हाल; गुंतवणुकीचा १२-१५-२० चा फॉर्म्युला समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:11 IST

1 / 6
कोट्याधीश होण्यासाठी खूप उत्पन्न असण्याची गरज नाही. पण, कमावलेले पैसे योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुतवण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हालाही भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य हवे तर आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून १२-१५-२० चा फॉर्म्युला वापरून गुंतवणूक करायला सुरुवात केली. तर वयाच्या ४० व्या वर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी तुमच्याकडे जमा असेल.
2 / 6
कोट्याधीश होणे हे नशिब किंवा रॉकेट सायन्स नाही. फक्त योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करावी हे माहित असणे आवश्यक आहे. तुम्हालाही वयाच्या ४०व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर १२-१५-२० चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
3 / 6
या फॉर्म्युल्यामध्ये १२ म्हणजे १२ टक्के परतावा, १५ म्हणजे १५ वर्षांसाठी गुंतवणूक आणि २० म्हणजे दरमहा २० हजार रुपयांची गुंतवणूक. या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या ४० व्या वर्षी कोट्यावधी रुपयांचा फंड उभा करू शकता.
4 / 6
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर की कोट्याधीश ठीक आहे. पण, गुंतवणूक कुठे करावी? जिथे तुम्हाला १२ टक्के परतावा मिळेल. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागेल. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही फंडाच्या मागील परताव्याचा अभ्यास करुन फंड निवडा.
5 / 6
तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला २० हजार रुपये गुंतवल्यास, १५ वर्षात तुम्ही केलेली एकूण गुंतवणूक ३६ लाख रुपये होईल. SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला १२ टक्के दराने परतावा मिळाला तर तुम्हाला एकूण ६४ लाख ९१ हजार रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला १५ वर्षात एकूण १ कोटी ९१ हजार रुपयांचा परतावा मिळेल.
6 / 6
तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला २० हजार रुपये गुंतवल्यास, १५ वर्षात तुम्ही केलेली एकूण गुंतवणूक ३६ लाख रुपये होईल. SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला १२ टक्के दराने परतावा मिळाला तर तुम्हाला एकूण ६४ लाख ९१ हजार रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला १५ वर्षात एकूण १ कोटी ९१ हजार रुपयांचा परतावा मिळेल.
टॅग्स :Investmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार