शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुंतवणुकीचा फंडा; असे करा 3 वर्षांत पैसे दुप्पट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 1:22 PM

1 / 7
इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून मोठा नफा कमवायचा असेल, तर त्यासाठी दीर्घ अवधीची गुंतवणूक हा मूलमंत्र आहे. यातील कंपाउंडिंगचा फायदा घेऊन अवघ्या ३ वर्षांत पैसे दुप्पट केले जाऊ शकतात.
2 / 7
३ वर्षांत ३०%पेक्षा अधिक परतावा पीजीआयएम मिडकॅप ऑपॉर्च्युनिटी फंड ४४.३% क्वांट मिडकॅप फंड४०.६% एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड३३.७% ॲडलविस मिडकॅप फंड३२.५%
3 / 7
मिरे ॲसेट मिडकॅप फंड३२.१% मोतिलाल ओसवाल मिडकॅप फंड३१.१% कोटक इमर्जन्सी मिडकॅप फंड३१.१% यूटीआय मिडकॅप फंड३०.२% निप्पॉन मिडकॅप फंड३०.०% महिंद्रा मॅनुलाईफ मिडकॅप फंड३०.०%
4 / 7
रिस्क घ्या, नवी संधी साधा जे लोक जोखीम उचलण्यास सक्षम आहेत, त्यांच्यासाठी मिडकॅप फंड चांगला पर्याय आहे. टॉप-१० मिडकॅप फंडांनी ३४ टक्के परतावा दिला आहे. या फंडांनी दरमहा १० हजार रुपयांच्या एसआयपीचे ६.८० लाख रुपये बनविले आहे. यातील प्रत्यक्षातील गुंतवणूक ३.६ लाखांचीच होते. याचाच अर्थ ३ वर्षांत पैसे दुप्पट!
5 / 7
फंड निवडताना हे लक्षात ठेवा कामगिरी : जे पीअर्स आणि बेंचमार्कला बुल मार्केटमध्येच नव्हे, तर बीअर मार्केटमध्येही घसरत नाहीत, त्यातच गुंतवणूक करा. कालावधी : ५ ते १० वर्षांसाठी गुंतवणूक ठेवण्याची क्षमता आहे, त्यांनीच मिडकॅपमध्ये गुंतवणूक करावी.
6 / 7
जोखीम : जोखीम उचलण्याची क्षमता असेल, तरच मिडकॅपमध्ये गुंतवणूक करा. एक्पेन्स रेशो : मिडकॅपमध्ये गुंतवणूक करताना एक्पेन्स रेशो जरूर पाहा. बचतीसाठी डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करा.
7 / 7
मिडकॅप फंड नेमका काय आहे? बाजारमूल्याच्या दृष्टीने बाजारात सूचीबद्ध असलेल्या १०१ ते २०२ या मधील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या फंडांना मिडकॅप म्हणतात. या फंडांना किमान ६५ टक्के गुंतवणूक मिडकॅपमध्ये करावी लागते. यात लार्जकॅपच्या तुलनेत जास्त, तर स्मॉलकॅपच्या तुलनेत कमी जोखीम असते.
टॅग्स :Investmentगुंतवणूकfundsनिधी