शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

3 मोठ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे पडले महागात, गुंतवणूकदारांना बसला प्रचंड फटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:31 IST

1 / 6
२०२४ या वर्षात अनेक म्युच्युअल फंड्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. ३५ म्युच्युअल फंड आहेत ज्यात गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागेल. पण, आपण अशा तीन म्युच्युअल फंड्सबद्दल जाणून घेऊन ज्यांनी १० टक्क्यांपेक्षा जास्त पैसा बुडवला.
2 / 6
क्वांट पीएसयू फंड - Quant PSU Fund या म्युच्युअल फंडने गुंतवणुकीवर २०.२८ टक्के नकारात्मक XIRR दिला. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने या फंडात महिन्याला १०,००० एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली असेल, तर त्याचे आतापर्यंत ९०,७६३ रुपये इतकेच झाले. खरंतर त्याची गुंतवणूक १,२०,००० रुपये इतकी असायला हवी होती.
3 / 6
Quant ELSS Tax Saver Fund - क्वांट इएलएसएस टॅक्स सेव्हर फंडातील गुंतवणुकीत ११.८८ टक्के नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे. या फंडात जर १०,००० दरमहिना गुंतवले असतील, तर आतापर्यंत १.१२ लाख रुपये आहे, खरंतर ते १ लाख २० हजार असायला हवेत.
4 / 6
Aditya Birla SL PSU Equity Fund - आदित्य बिर्ला एसएल पीएसयू इक्विटी फंडातही गुंतवणूक करणाऱ्यांना ११.१३ टक्के इतका तोटा झाला आहे. दरमहा १०,००० रुपये गुंतवल्यानंतर यातील पैसे जास्त होणे अपेक्षित होते, पण ते १.१२ लाख इतकेच आहेत.
5 / 6
याशिवाय २०२४ मध्ये ज्या इक्विटी म्युच्युअल फंडांनी एसआयपी द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना झटका दिला आहे. म्युच्युअल फंडात ०.०४ टक्क्यांपासून ते ९.६६ टक्क्यांपर्यंत नकारात्मक परिणाम मिळाले आहेत.
6 / 6
टीप - यामध्ये म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टॅग्स :Investmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारMarketबाजारStock Marketशेअर बाजार