शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IRCTC द्वारे तुम्ही घरबसल्या 80 हजार रुपये कमवू शकता, फक्त करावे लागेल 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:06 IST

1 / 7
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीचा (IRCTC) सध्या खूप उपयोग होतो. याद्वारे तुम्ही केवळ कन्फर्म ट्रेन तिकीटच मिळवू शकत नाही, तर त्याच्या मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपये कमवू शकता.
2 / 7
यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तर घरबसल्या एक छोटेसे काम करावे लागेल. दरम्यान, आयआरसीटीसी दरमहा 80 हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी देत ​​आहे. यासाठी तुम्हाला फक्त तिकीट एजंट बनायचे आहे. ज्याप्रमाणे रेल्वे काउंटरवरील क्लर्क प्रवाशांसाठी तिकीट काढतात, त्याचप्रमाणे तुम्हालाही प्रवाशांची तिकिटे काढावी लागतात.
3 / 7
ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटला भेट देऊन एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही अधिकृत तिकीट बुकिंग एजंट व्हाल आणि घरी बसून मोठी कमाई करू शकाल.
4 / 7
जर तुम्ही अधिकृत आयआरसीटीसीचे अधिकृत तिकीट बुकिंग एजंट झालात तर तुम्ही तत्काळ, आरएसी (RAC)इत्यादींसह सर्व प्रकारची रेल्वे तिकिटे बुक करू शकता. तिकिटांच्या बुकिंगवर, एजंटना आयआरसीटीसीकडून चांगले कमिशन मिळते.
5 / 7
जर तुम्ही एजंट असाल आणि प्रवाशासाठी नॉन एसी कोचचे तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला प्रति तिकीट २० रुपये आणि एसी क्लासचे तिकीट बुक केल्यावर तुम्हाला ४० रुपये कमिशन आयआरसीटीसीकडून मिळेल. याशिवाय, तिकिटाच्या किमतीच्या एक टक्का रक्कमही एजंटला दिली जाते.
6 / 7
आयआरसीटीसी एजंट बनण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तिकीट बुक करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. एका महिन्यात तुम्हाला हवी तितकी तिकिटे बुक करू शकता. याशिवाय, 15 मिनिटांत तत्काळ तिकीट बुक करण्याचाही पर्याय आहे. एजंट म्हणून, तुम्ही गाड्यांव्यतिरिक्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई तिकिटे बुक करू शकता.
7 / 7
जर तुम्हाला एका वर्षासाठी एजंट व्हायचे असेल तर तुम्हाला आयआरसीटीसीला 3,999 रुपये शुल्क द्यावे लागेल. तसेच, दोन वर्षांसाठी 6,999 रुपये द्यावे लागेल. याचबरोबर, एक एजंट म्हणून एका महिन्यात 100 तिकिटे बुक केल्यास प्रति तिकिट 10 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर एका महिन्यात 101 ते 300 तिकिटे बुक केल्यानंतर प्रति तिकिट 8 रुपये आणि एका महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिटे बुक केल्यावर प्रति तिकिट 5 रुपये शुल्क आकारले जाते.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वे