पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 14:53 IST
1 / 6नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे २०२५-२६ पर्यंत बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी करत आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणाऱ्यांना खूप दिलासा मिळणार आहे. 2 / 6ईटी नाऊच्या रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वे २०२५-२६ या आर्थिक वर्षात १० नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. या ट्रेनमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा असतील आणि त्यांचे इंटीरियरही शानदार आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. 3 / 6या ट्रेन चालवण्यापूर्वी आवश्यक चाचण्या आणि ट्रायल रन घेतले जाईल. चेन्नईच् आयसीएफचे जीएस यू सुब्बा राव यांनी सांगितले की, १५ नोव्हेंबरपासून दोन महिन्यांसाठी या ट्रेन्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातील. या चाचणीनंतर सर्वसामान्यांसाठी ट्रेन्स सुरू केल्या जातील.4 / 6अलीकडेच, या ट्रेन्स बनवणाऱ्या बीईएमएल कंपनीने पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट चेन्नईतील आयसीएफला सोपविली होती. मात्र, भारतीय रेल्वेने या स्लीपर ट्रेन्सचे नेमके मार्ग अद्याप जाहीर केलेले नाहीत. पण पहिल्या काही ट्रेन्स नवी दिल्ली आणि पुणे किंवा नवी दिल्ली आणि श्रीनगर या प्रमुख शहरांना जोडतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.5 / 6नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन्स अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हाय पॉवर आणि ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या या ट्रेन्स विविध सुविधांनी सुसज्ज आहेत. यामध्ये क्रॅश बफर आणि खास डिझाइन केलेले कपलर यांचा समावेश आहे. १६ कार ट्रेनसेटमध्ये ८२३ प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असेल.6 / 6वंदे भारत स्लीपर ट्रेन्स देशातील लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात किंवा रात्रीच्या प्रवासात क्रांती घडवून आणण्यासाठी डिझाइन केल्या जात आहेत. या ट्रेन्स जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव आणि सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी तयार केल्या जात आहेत.