आता विनाकारण चेन पुलिंग महागात पडणार; ट्रेन थांबली, तर दर मिनिटाला एवढा दंड मोजावा लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:36 IST
1 / 7आता ट्रेनमधून प्रवास करताना विनाकारण ट्रेनची साखळी ओढली अथवा चेन पुलिंग महागात पडणार आहे. आता असे केल्यास 500 रुपयांच्या दंडाशिवाय आपल्याला डिटेन्शन चार्जेस देखील भरावे लागणार आहेत.2 / 7डिटेन्शन चार्ज दर मिनिटाला 8 हजार रुपये एवढा असेल. याशिवाय 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. अशा प्रकारे ट्रेन 5 मिनिटे थांबली तर चेन ओढणाऱ्याला 40 हजार रुपये डिटेन्शन चार्ज आणि 500 रुपये दंड भरावा लागेल.3 / 7दर मिनिटाला वसून केले जातील 8 हजार रुपए... - रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एकदा चेन पुलिंगनंतर ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी जवळपास 5-7 मिनिटे लागतात. या काळात रेल्वेला मोठे नुकसान सोसावे लागते. यासाठी आतापर्यंत केवळ 500 रुपये एवढ्याच दंडाची तरतूद होती. मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला आहे.4 / 7भोपाळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक देवाशिष त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या भोपाळ विभागात 6 डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. गेल्या 3 महिन्यांत भोपाळ रेल्वे विभागात चेन पुलिंगच्या 1262 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.5 / 7रेल्वे अॅक्टच्या कलम 141 नुसार, या प्रकरणात एकूण 2 लाख 90 हजार 775 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 6 / 7अशा प्रवाशांवरही होणार कारवाई - रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन पुलिंगनंतर अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरून पळू लागतात. नव्या व्यवस्थेनुसार, अशा लोकांनाही चेन पुलिंगसाठी दोषी मानले जाईल. पकडले गेल्यानंतर, त्यांच्यावरही स्वतंत्रपणे दंडत्मक कारवाई केली जाईल. 7 / 7यामुळे, चेन पुलिंग दरम्यान कुठल्याही निर्दोष प्रवाशाने ट्रेनमध्ये चढण्याचा अथवा ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू नये. असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.