शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आता अमेरिकेतून येणार स्वस्त सोने-चांदी! व्यापार कराराचा मोठा फायदा; देशांतर्गत किमती घटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:06 IST

1 / 8
भारत आता सोने आणि चांदीच्या आयातीसाठी संयुक्त अरब अमिरातीवर अवलंबून न राहता अमेरिकेकडून अधिक खरेदी करणार आहे.
2 / 8
अमेरिकेतून थेट आणि मोठ्या प्रमाणावर मौल्यवान धातूंची आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
3 / 8
भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने विकतो, पण त्या तुलनेत आयात कमी करतो. अमेरिकेकडून सोने खरेदी केल्यास दोन्ही देशांमधील व्यापाराचा समतोल राखला जाईल.
4 / 8
जीपीयू सर्व्हरवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. यामुळे भारतात डेटा सेंटर उभारण्याचा खर्च १४ टक्क्यांनी कमी होणार असून तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना मिळेल.
5 / 8
भारतीय उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत मोठी सवलत मिळणार आहे. सुमारे ३०.९४ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवरील शुल्क ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे.
6 / 8
भारताच्या १०.०३ अब्ज डॉलर्स किमतीच्या विविध उत्पादनांना अमेरिकेत एकही रुपया शुल्क न भरता प्रवेश मिळेल. याचा मोठा फायदा भारतीय निर्यातदारांना होईल.
7 / 8
या करारामुळे कापड उद्योग, चर्मोद्योग, हिरे-दागिने, औषध निर्मिती आणि मशिनरी बनवणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेत मोठा नफा कमावता येईल.
8 / 8
अमेरिकेकडून आयात करताना भारताने आपल्या अटी कायम ठेवल्या आहेत. भारतात जीएम अन्नाला परवानगी नसेल आणि सर्व कृषी उत्पादनांना जैव-सुरक्षेचे कडक नियम पाळावे लागतील.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीTrade Tariff Warटॅरिफ युद्धAmericaअमेरिका