महाकुंभात बोट चालवून कमावले ३० कोटी रुपये; आता सरकारकडे किती टॅक्स भरावा लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:01 IST
1 / 7प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून लोक आले होते. या धार्मिक उत्सवात अब्जावधी रुपयांची आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली. साधं उदाहरण द्यायचं झालं तर एका नावाड्याने ४५ दिवसांत ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे, या नावाड्याकडे १३० बोटी होत्या. प्रत्येक बोटीचे दररोज सरासरी २३ लाख रुपये उत्पन्न मिळत होते.2 / 7आता या मोठ्या कमाईवर या नावाड्याला किती कर भरावा लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नावाड्याचे हे उत्पन्न मोठ्या कंपनीच्या सीईओच्या वार्षिक पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.3 / 7पिंटू महारा, असं या नावाड्याचं नाव आहे. पिंटू यांनी महाकुंभ मेळ्यातील संधी अचूक हेरुन १३० बोटींच्या मदतीने तब्बल ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या बंपर कमाईनंतर आता त्यांना आयकर भरावा लागणार आहे. 4 / 7१५ लाखांपेक्षा जास्त कमाई ३० टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येते. आयकर विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आयकर कॅल्क्युलेटरनुसार, नाविक पिंटू महारा यांच्या ३० कोटी रुपयांच्या उत्पन्नावरील कर दायित्व अंदाजे १२,७९,६४,८५० रुपये म्हणजेच १२ कोटी ८० लाख रुपये आहे.5 / 7यामध्ये मिळकतकराची एकूण रक्कम ८,९८,१२,५०० रुपये, अधिभार ३,३२,३०,६२५ रुपये आणि आरोग्य आणि शिक्षण उपकर ४९,२१,७२५ रुपये आहे. ही रक्कम जोडल्यानंतर एकूण कर दायित्व सुमारे १२ कोटी ८० लाख रुपये येते.6 / 7कारण, करपात्र उत्पन्नाची गणना उत्पन्नातून खर्च वजा करून केली जाते. या संदर्भात, जर खलाश पिंटू महारा यांनी खर्च वजा करून आपले उत्पन्न २० कोटी रुपये असल्याचे घोषित केले, तर ८ कोटी ५२ लाख २० हजार ८५० रुपये कर दायित्व आहे.7 / 7प्रयागराजचे नाविक पिंटू महारा यांनी महाकुंभासाठी ७० बोटी बनवून घेतल्या. यासाठी पिंटू यांनी बँकेकडून कर्ज घेतले तर काही पैसे दागिने गहाण ठेवून जमा केले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की नावाड्याकडे १३० बोटी होत्या.