माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
NPS Changes in Budget 24: अर्थसंकल्पात NPS बदलाचा फटका की फायदा...; ५० हजार पगार असेल तर काय होणार परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 09:45 IST
1 / 10अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. इन्कम टॅक्समध्ये दिलासा देण्यासोबतच एंजल वनसारखे टॅक्स संपवण्याचीही घोषणा करण्यात आली. 2 / 10अर्थसंकल्पात न्यू टॅक्स रिजीममध्ये Tax Slab ही चेंज करण्यात आला असून त्यातून आधीपेक्षा जास्त टॅक्स सेविंग करणार आहे. परंतु NPS बाबत सरकारने एक विशेष बदल केला आहे जो कर्मचाऱ्यांच्या मासिक बजेटवर परिणामकारक ठरणार आहे.3 / 10अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नॅशनल पेन्शन सिस्टम(NPS) अंतर्गत सवलत वाढवली आहे. आता कंपनी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीतून १० टक्क्यांऐवजी १४ टक्के कपात करणार आहे. याचा अर्थ जे कर्मचारी आधी NPS मध्ये १० टक्के योगदान होते आता त्यांना १४ टक्के योगदान द्यावं लागेल.4 / 10उदा - जर तुमचा बेसिक पगार ५० हजार रुपये असेल आणि तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये योगदान देत असाल तर पहिल्या नियमानुसार ५ हजार रुपये महिन्याला द्यावे लागत आता हा नियम बदलला आहे. त्यामुळे १४ टक्के म्हणजे ५० हजार बेसिक सॅलरीवर ७ हजार रुपये योगदान द्यावे लागेल जे तुमच्या रिटायरमेंट फंडमध्ये जमा होईल.5 / 10मध्यमवर्गीय पगारदार वर्ग त्यांचा खर्च पगारातून मॅनेज करतात. कर्जापासून घर खर्च आणि अन्य खर्च हा पगारातून होतो. अशावेळी एनपीएसमध्ये झालेला हा बदल कर्मचाऱ्यांचा मासिक बजेट बिघडवू शकतो. हा पण रिटायरमेंट नंतर त्याला आधीपेक्षा जास्त लाभ मिळणार आहे.6 / 10NPS मधील हे बदल स्पष्ट शब्दात सांगायचे तर, आता तुमची कंपनी सॅलरीतून NPS खात्यात दर महिने बेसिक पगाराच्या १४ टक्के पैसे जमा करणार आहे. जे तुमच्या रिटायरमेंटनंतर पेन्शन वाढीसाठी लाभदायक ठरणार आहे. तर सरकारही तुमच्या NPS खात्यात १४ टक्के पैसे जमा करतील.7 / 10आता आधीपेक्षा ४ टक्के जास्त एनपीएस अकाऊंटमध्ये डिपॉझिट होतील. मॅच्युरिटीनंतर जमा झालेल्या पैशातून ६० टक्के पैसे कर्मचारी काढू शकतात आणि ४० टक्के रक्कम पेन्शनवर खर्च केली जाऊ शकते. 8 / 10NPS ही मार्केट लिंक्व्ड स्कीम आहे जी सध्याच्या काळात रिटायरमेंट प्लॅनसाठी खूप लोकप्रिय आहे. सुरुवातीला ही स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केली होती पण २००९ नंतर सरकारने नॅशनल पेन्शन स्कीम खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली.9 / 10एनपीएसमध्ये २ प्रकारची खाती उघडता येऊ शकतात. त्यात पहिलं एनपीएस टीयर १ एक रिटायरमेंट अकाऊंट आहे तर टीयर २ हे वॉलंटरी अकाऊंट आहे. हा पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट अथॉरिटीकडून मॅनेज केला जातो. यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.10 / 10PFRDA ने २०२३-२४ मध्ये विना सरकारी क्षेत्रातील ९ लाख ४७ हजार नव्या ग्राहकांना जोडले. ज्यामुळे NPS रक्कम दरवर्षी ३०.५ टक्क्यांनी वाढून ११.७३ लाख कोटी झाली.